हिंदू कुटुंबाने कमीत कमी ३ मुलं जन्माला घाला; भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 10:16 AM2019-12-09T10:16:35+5:302019-12-09T10:16:55+5:30
एकीकडे देशभरात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करावा अशी मागणी होत आहे
लखनऊ - अनेकदा देशात भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या विधानांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याचं लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या नेत्यांना तंबी दिली होती. पंतप्रधानांच्या तंबीनंतरही भाजपा नेत्यांची बेताल विधान सुरुच असल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातील मंत्री सुनील भराला यांनी हिंदू कुटुंबाने तीन मुले जन्माला घाला असा सल्ला दिला आहे.
याबाबत सुनील भराला यांनी सांगितले की, आज समाजात फक्त दोन मुलांना जन्म द्यावा अशी मागणी केली जाते. मात्र असा कोणताही कायदा नाही, बहुतांश हिंदू कुटुंब एकास मुलाला जन्म देतात. मला वैयक्तिक वाटतं की, हम पॉंच याचा विचार हिंदू कुटुंबांनी करायला हवा. प्रत्येक कुटुंबात तीन मुले आणि त्यात एक मुलगी असायला हवी असं त्यांनी सांगितले.
UP Minister Sunil Bharala: There should be at least 3 children in every family with one of them mandatorily a girl child. How else will relations like aunts, grandmothers come in families? (08.12.2019) https://t.co/0v3coiau6Y
— ANI UP (@ANINewsUP) December 8, 2019
एकीकडे देशभरात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करावा अशी मागणी होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा कायद्याची गरज आहे असं सांगितले आहे. मात्र सुनील भराला यांच्या विधानामुळे भाजपाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. इदरीशपूर गावातील एका समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तसेच हैदराबाद येथे जे घडले ते दुर्दैवी आहे. पोलिसांनी चांगले काम केले, उन्नाव घटनेबाबतही उत्तर प्रदेश सरकार गंभीर आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही असा इशाराही मंत्री सुनील भराला यांनी दिला आहे.