हिंदूंनाही चार मुले असावीत - स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 06:10 AM2017-11-26T06:10:08+5:302017-11-26T06:10:29+5:30

देशात समान नागरी कायदा येईपर्यंत प्रत्येक हिंदूलाही चार मुले असावीत, असे मत हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

Hindus should have four children - Swami Govind Dev Girije Maharaj | हिंदूंनाही चार मुले असावीत - स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

हिंदूंनाही चार मुले असावीत - स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

Next

उडुपी : देशात समान नागरी कायदा येईपर्यंत प्रत्येक हिंदूलाही चार मुले असावीत, असे मत हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेतर्फे येथे हिंदू धर्मसंसद सुरू आहे. तिथे गिरीजी महाराज म्हणाले, की केवळ दोन मुले असावीत, हे धोरण हिंदूंनी सोडून द्यायला हवे. समान नागरी कायदा झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. देशाच्या ज्या भागात हिंदू समाज अल्पसंख्य ठरतो, तिथे भौगोलिक असंतुलन तयार होते. हिंदूंची लोकसंख्या कमी झाल्याने भारताला बºयाच भागावर पाणी सोडावे लागले आहे. यापुढे असे होऊ नये, यासाठी हिंदूंनाही चार मुले तरी किमान असायला हवीत. सरकारचे धोरण दोन मुले पुरे असे असले, तरी त्याचे पालन समान नागरी कायदा झाल्यानंतरच व्हायला हवे. या धर्मसंसदेत दोन हजारांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Hindus should have four children - Swami Govind Dev Girije Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hinduहिंदू