“ज्या दिवशी भारतीय मुस्लीम अरब देशाकडे तक्रार करतील तेव्हा वादळाचा सामना करावा लागेल”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:48 PM2020-04-29T14:48:04+5:302020-04-29T15:27:55+5:30
दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी या संदर्भात हिंदीमध्ये वादग्रस्त पोस्ट केली आहे
नवी दिल्ली – दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ज्या दिवशी मुस्लीम अरब देशांकडे तक्रारी करतील त्या दिवशी वादळाचा सामना करावा लागेल असं धक्कादायक विधान जफरुल इस्लाम खान यांनी केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्याने इस्लाम देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप भाजपाने जफरुल इस्लाम यांच्यावर केला आहे.
याबाबत जफरुल इस्लाम खान यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ज्या दिवशी भारतातील मुस्लीम अरब आणि अन्य मुस्लीम देशांकडे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करतील, त्यादिवशी त्सुनामी येईल. धन्यवाद कुवैत, भारतीय मुस्लिमांच्या मदतीसाठी उभे राहिल्याबद्दल, कट्टर हिंदुत्ववादी लोकांना वाटतं की, अरब आणि अन्य मुस्लीम देश आपल्या आर्थिक हिंतसंबंधामुळे भारतातील मुस्लिमांवरील अत्याचाराची चिंता करणार नाहीत. भारतातील मुस्लिमांची अरब आणि अन्य मुस्लीम देशात प्रचंड लोकप्रियता आहे हे कदाचित हे विसरले असतील. भारतीय मुस्लिमांनी अनेक वर्षापासून सद्भावनेने इस्लामची सेवा केली आहे. इस्लामच्या उल्लेखनीय अभ्यासकांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश आहे, ज्यांनी जागतिक वारसा म्हणून त्यांचे सांस्कृतिक योगदान दिले आहे. शाह वलीउल्लाह देहलवी, इक्बाल, अबुल हसन नदवी, वहीदुद्दीन खान, झाकीर नाईक यांची नावे अरब आणि मुस्लिम देशातील प्रत्येक घरात मोठ्या सन्मानाने घेतली जातात असं त्यांनी सांगितले.
तसेच या कट्टरपंथींनी हे जाणून घ्यावं की, भारतीय मुस्लिमांनी आतापर्यंत द्वेष मोहीम, लिंचिंग आणि दंगलीची कोणतीही तक्रार अरब आणि इतर मुस्लिम जगाताकडे केली नाही. ज्या दिवशी त्यांना असं करण्यास भाग पाडले जाईल त्या दिवशी कट्टरतावाद्यांना वादळाचा सामना करावा लागेल असा इशारा जफरुल इस्लाम यांनी फेसबुक पोस्टमधून दिला आहे. दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी या संदर्भात हिंदीमध्ये पोस्ट केले आहे
त्यांच्या या पोस्टवर भाजपाचे दिल्लीचे नेते कपिल मिश्रा म्हणाले की, कठोर व विषारी विचार असणाऱ्या जफरुल इस्लाम यांना त्वरित पदावरून दूर करा. झाकीर नाईकला त्यांचे समर्थन आहे. देशाच्या आत हल्ल्यांविषयी बोलत आहेत. अशा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीचं 'आप'ने दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुखपद कायम ठेवले आहे. त्यांना त्वरीत या पदावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
CM @ArvindKejriwal
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) April 29, 2020
घटिया और जहरीली सोच वाले @khan_zafarul को तुरन्त पद से हटाइये
आतंकी जाकिर नाइक का समर्थन कर रहा है
देश के अंदर हमलों की बात कर रहा हैं
ऐसे आतंकी सोच वाले को AAP ने दिल्ली अल्पसंख्यक आयोग का मुखिया बना रखा है
हमारी मांग और चेतावनी - इसे तुरंत हटाइये pic.twitter.com/9snwBYPCDz
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कुवेतचा हवाला देत भारतातील मुस्लिमांवरील अत्याचाराचा खोटा दावा करण्यात येत आहे. भारताच्या धार्मिक बदनामीची मोहीम राबविली जात आहे. २७ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते की, दिशाभूल करणार्या पोस्ट भारतात पसरल्याचा कुवेत सरकारशी काही संबंध नाही. कुवेत सरकारने आश्वासन दिले आहे की त्यांना भारताशी जवळची मैत्री हवी आहे. भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्यावर कुवेत कुणाच्या सोबत नाही असं स्पष्ट केले आहे.