‘हिंदुत्ववादी’ चित्रपट ‘इफ्फी’त झळकणार!

By Admin | Published: November 15, 2015 02:16 AM2015-11-15T02:16:39+5:302015-11-15T02:16:39+5:30

आक्रमक हिंदुत्वादाचा पुरस्कार करणारा चित्रपट असल्याचे कारण देत, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाकारलेल्या चित्रपटाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील

'Hindutva' film will be seen in IFFI! | ‘हिंदुत्ववादी’ चित्रपट ‘इफ्फी’त झळकणार!

‘हिंदुत्ववादी’ चित्रपट ‘इफ्फी’त झळकणार!

googlenewsNext

पणजी : आक्रमक हिंदुत्वादाचा पुरस्कार करणारा चित्रपट असल्याचे कारण देत, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाकारलेल्या चित्रपटाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागाची सुरुवात होणार आहे.
विनोद मंकारा दिग्दर्शित ‘प्रियमानसम’ या संस्कृत चित्रपटाने यंदाच्या इंडियन पॅनोरमाची सुरुवात करण्याचा मान मिळवला असून, गोव्यातील पुरोगामी संघटनांचा त्यास विरोध होऊ शकतो.
१७ व्या शतकातील संस्कृत कवी उन्नयी वॉरियर यांच्या जीवनावर आधारित या वादग्रस्त चित्रपटात कथानायकाच्या मानसिक द्वंद्वाचे चित्रण करण्यात आले आहे. ‘नलचरितम अट्टकथा’ या नृत्यनाट्याच्या निर्मितीत रममाण झालेल्या या कवीश्रेष्ठावर बेतलेल्या या चित्रपटात हिंदुत्ववादाचा पुरस्कार केल्याचे निर्देशक विनोद मंकारा यांनी नाकारले. ‘माझा चित्रपट ही एक निव्वळ कलाकृती म्हणून प्रेक्षकांनी पाहावी. तिथे कोणत्याही वैचारिक भूमिकेला थारा देत नाही,’ असे सांगून हा चित्रपट इफ्फीत दाखवला जाणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. केरळ चित्रपट महोत्सवाशी संबंधित व्यक्ती चित्रपट किंवा दृकश्राव्य माध्यमाशी संबंध नसलेली आहेत. परीक्षक मंडळही परिपूर्ण नव्हते, असे त्यांनी सांगितले.
‘प्रियमानसम’ ही गेल्या २२ वर्षांतील पहिली संस्कृत चित्रपट निर्मिती ठरली आहे. या आधीही केवळ दोन संस्कृत चित्रपटांची निर्मिती झाली होती. त्यात आदि शंकराचार्य (१९८३) आणि भगवद्गीता (१९९३) यांचा समावेश आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन जी. व्ही. अय्यर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Hindutva' film will be seen in IFFI!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.