हिंदूत्ववादी संघटनांना हवी चामड्याच्या बूटावर बंदी

By admin | Published: November 13, 2015 09:52 AM2015-11-13T09:52:42+5:302015-11-13T09:56:02+5:30

देशभरात गोमांस बंदीचा वाद ताजा असतानाच आता गायीच्या चामड्यापासून बनवलेल्या बुटावरही बंदी टाकण्याची मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे.

Hindutva organizations want ban on leathers | हिंदूत्ववादी संघटनांना हवी चामड्याच्या बूटावर बंदी

हिंदूत्ववादी संघटनांना हवी चामड्याच्या बूटावर बंदी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १३ -  देशभरात गोमांस बंदीचा वाद ताजा असतानाच आता गायीच्या चामड्यापासून बनवलेल्या बुटावरही बंदी टाकण्याची मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे. मिंत्रा या वेबसाईटवरील बुटाच्या विक्रीवर संघटनांनी आक्षेप घेतला असून हिंदूंच्या भावना दुखावणा-या मिंत्राने माफी मागावी असेही हिंदूत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. 

मिंत्रा या शॉपिंग वेबसाईटवर गायीच्या चामड्यापासून बनवलेले बूट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यावर rss_org नामक ट्विटर अकाऊंटवरुन आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने सुरु असलेल्या या ट्विटर अकाऊंटला फोलो करणा-यांमध्ये अरुण जेटली, स्मृती इराणी यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. 'गायीच्या चामड्यापासून बनवलेल्या बूटांची विक्री करुन हिंदूंच्या भावना दुखावणा-या मिंत्रावर सरकारने कारवाई करावी' असे ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर मिंत्रानेही उत्तर दिले आहे. बाहेरच्या देशांमधून मागवलेल्या चामड्यापासून हे बूट तयार करण्यात आले असून आम्ही नियमांचे पालन करतो असे मिंत्राने म्हटले आहे. 

संघाचे कर्नाटकमधील प्रसिद्धीप्रमुख राजेश पदमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना हे अकाऊंट आमच्या स्वयंसेवकांचे असून आम्ही या अकाऊंटवरील सर्व विचारांचे समर्थन करतो असे सांगितले. तर शुक्रवारी सकाळी संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर rss_org या अकाऊंटशी संघाचा संबंध नाही असे ट्विट करण्यात आले आहे. 

Web Title: Hindutva organizations want ban on leathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.