"हिंदुत्व एक आजार, लाखो भारतीय प्रभावित", इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 23:00 IST2024-12-07T22:56:52+5:302024-12-07T23:00:12+5:30
Iltija Mufti : भगवान रामाचे नाव घेतलं नाही म्हणून कथितरित्या एका मुस्लिम मुलांची हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना इल्तिजा मुफ्ती यांनी हे विधान केलं आहे.

"हिंदुत्व एक आजार, लाखो भारतीय प्रभावित", इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त विधान
Iltija Mufti : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचं एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे. हिंदुत्व हा एक आजार आहे, ज्यामुळं भारतातील लाखो लोक प्रभावित झाल्याचं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भगवान रामाचे नाव घेतलं नाही म्हणून कथितरित्या एका मुस्लिम मुलांची हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना इल्तिजा मुफ्ती यांनी हे विधान केलं आहे.
भगवान रामाचं नाव न घेतल्यानं मुस्लिम अल्पवयीन मुलांना चप्पलनं इतकी मारहाण करताना पाहून प्रभू रामाचंही डोकं शरमेने झुकेल. हिंदुत्व हा एक आजार आहे. ज्यामुळं भारतातील लाखो लोक प्रभावित झाले आहेत, असं इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या. यावरून आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. रतलामचा व्हायरल झालेला व्हिडिओही लोक स्वीकारत नाहीत, ज्यामुळं वाद झालाय.मात्र, इल्तिजा मुफ्ती यांच्या थेट हिंदुत्वावरच्या विधानवरही नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इल्तिजा मुफ्ती यांनी नंतर आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, मला राग आला होता आणि निष्पाप मुलांना अशा प्रकारे मारहाण केली जात होती, हे पाहू शकत नव्हते. तसंच,आपल्या ट्विटमध्ये भगवान रामाचा उल्लेख करण्याबाबत त्या म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात या देशात मुस्लिमांवर खूप हिंसाचार झाला आहे, मॉब लिंचिंग झाली आहे, जर रामाचं नाव घेतलं नाही तर त्यांना मारहाण केली जाते. हे मारहाण करणारे लोक रामराज्याबद्दल बोलतात, मात्र, थोडेच रामराज्य आहे.
याचबरोबर, इल्तिजा मुफ्ती यांनी आपला मुद्दा पुढं करत हिंदुत्वानं प्रत्येकाच्या विचारात विष कालवलं आहे. हा एक आजार आहे. एक मुस्लिम म्हणून मी हे समजू शकतो. दहशतवाद्यांनी जशी इस्लामची बदनामी केली, तशीच हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू धर्माचीही बदनामी केली जात आहे, असंही इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. दरम्यान, इल्तिजा मुफ्ती यांनी यापूर्वीही अशी विधानं केली आहेत.