त्याच्या बँक खात्यावर अचानक जमा झाले 10 कोटी अन्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 01:41 PM2018-03-20T13:41:15+5:302018-03-20T17:46:46+5:30
तुमच्या बँक खात्यावर अचानक दहा कोटी जमा झाले तर....
नवी दिल्ली - तुमच्या बँक खात्यावर अचानक दहा कोटी जमा झाले तर....आपण विचारही करु शकणार नाही. पण हे खरं झाले आहे. नवी दिल्लीतील एका तरुणाच्या खात्यावर 10 कोटी रुपये जमा झाले. दहा कोटी रुपयांचा मेसेज मोबाईलवर वाचून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कुटुंब आनंदात बेभान झालं होतं पण त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला.
मोबाईल दुकान चालवणाऱ्या विनोद कुमार या तरुणाच्या खात्यावर 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो एका क्षणात कोट्यधिश झाला होता. पण ज्येवळी तो पैसे काढण्यासाठी तो बँकमध्ये गेला..पण त्याचं खात बँकेनं बंद केलं होते. ज्यावेळी तो तरुण कोट्यधिश झाला ही गोष्ट सर्वांना माहित झालं त्यावेळी त्याच्या घरी तुडुंब गर्दी झाली होती. विनोद कुमार परिवारांसोबत जहांगीरपुरी परिसरात राहतो. घराजवळच त्याचे एक छोट मोबईलच दुकान आहे.
विनोद कुमारने सांगितले की, जहांगीरपुरी भागातील एसबीआय शाखेत त्याचे खात आहे. रविवारी दुपारी त्याला बँकेकडून एक मेजेज आला. खात्यावर 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. एसएमएस पाहून तो चिंतीत पडला. की आपल्या खात्यावर एवढी रक्कम कोण जमा करु शकतो? हे त्याला कळायला मार्ग नव्हता. थोड्यावेळ त्याने याला मेसेजला मस्करीत घेतले. याबद्दलची माहिती त्याने आपल्या मित्रांना सांगितली.
त्याच्या मित्रांनी त्याला एटीएममध्ये जाऊन जमा रक्कम तपासायला सांगितली. कारण रविवार असल्यामुळं बँक होती. एटीएममध्ये गेल्यानंतर खात्यावर 9,99,99,999 रुपये जमा असल्याचे त्याला समजले. त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण बँकने खातं बंद केल्यामुळं त्याला पैसे काढता आलं नाहीत. सोमवारी सकाळी तो बँकमध्ये पोहचला गर्दी पाहून तो माघारी परताला. विनोदने सांगितले की, आज तो बँक मॅनेजरची भेट घेणार आहे.