"वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे त्यांची सवय..."; केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष शंकराचार्यांवर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:56 AM2024-07-17T11:56:40+5:302024-07-17T11:58:02+5:30
Swami Avimukateshwaranand: "त्यांनी (शंकराचार्य) यासंदर्भात पुरावे सादर करावेत. वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे," असे अजय यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमधील केदारनाथ धामसंदर्भात बोलतानना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठा दावा केला आहे. येथून 228 किलो सोने गायब झाले आहे. हा मोठा घोटाळा आहे, मात्र यावर कुणीच बोलत नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. यानंतर, श्री बद्रीनाथ-केदारनाथमंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनीची प्रतिक्रिया आली आहे. "त्यांनी (शंकराचार्य) यासंदर्भात पुरावे सादर करावेत. वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे," असे अजय यांनी म्हटले आहे.
'वाद निर्माण करणे, सनसनाटी पसरवणे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय' -
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितिचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले, केदारनाथ धाममध्ये असे (228 किलो सोनं गायब झालं) झाल्याचे बोलणे, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. यासंदर्भात शंकराचार्यानी पुरावे सादर करायला हवेत, अशी विनंतीही त्यानी केली. एवढेच नाही तर, "मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा आदर करतो. मात्र, ते दिनभर प्रेस कॉन्फ्रन्स करत राहतात. वाद निर्माण करणे, सनसनाटी पसरवणे आणि चर्चेत राहणे, ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे."
केदारनाथच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार नाही -
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणाले, "केदारनाथ धाममधील सोने गायब झाल्यासंदर्भातील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना विनंती करतो आणि आव्हानही करतो की त्यांनी तथ्य आणि पुरावे समोर आणावेत. त्यानी अधिकाऱ्यांकडे जायला हवे, पुरावे सादर करायला हवेत. अन्यथा अनावश्यक वाद निर्माण करून केदारनाथच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा त्याना कसलाही अदिकार नाही."
काय म्हणाले होते शंकराचार्य? -
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल.
गेल्या वर्षी केदरनाथ मंदिरातील एका वरिष्ठ पुजाऱ्याने केदारनाथ मंदिरामध्ये सोनाच्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळाचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता. यासंदर्भात शंकराचार्य म्हणाले, केदारनाथमधील २२८ किलो सोनं गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणताहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही.