इतिहासकार परेरा यांचे अमेरिकेत निधन
By admin | Published: January 28, 2015 04:45 AM2015-01-28T04:45:05+5:302015-01-28T04:45:05+5:30
गोव्याचे सुपुत्र, संस्कृत विद्वान, इतिहासकार, लेखक, संगीतकार, भाषातज्ज्ञ तथा चित्रकार डॉ. जुझे परेरा (८४) यांचे मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
पणजी : गोव्याचे सुपुत्र, संस्कृत विद्वान, इतिहासकार, लेखक, संगीतकार, भाषातज्ज्ञ तथा चित्रकार डॉ. जुझे परेरा (८४) यांचे मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
कुडतरी येथे २२ जानेवारी १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. १९५१ साली त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये संस्कृतमधून पदवी घेतली. त्याआधी १९४९ मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयात ‘पुरातन इतिहास व संस्कृती’ या विषयात त्यांनी पीएच़डी़ केली. नंतर ते पोर्तुगालमध्ये लिस्बन इन्स्टिटो सुपरियर दी इस्तुदियश उल्त्रामारिनोस या संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. गोवा पोर्तुगिजांचे उदात्तीकरण करू शकत नाही, या त्यांच्या जाहीर विधानांमुळे वर्षभरातच त्यांना पोर्तुगाल सोडावे लागले. १९७0ला ते अमेरिकेत स्थायिक झाले. डॉ.परेरा यांच्या नावावर १४५ संशोधन प्रबंध आहेत. २0१0 साली पर्वरी येथे झालेल्या हिंदू देवदवतांवरील त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन वादग्रस्त ठरले होते.