न्यायव्यवस्थेसाठी 'ऐतिहासिक दिन', सर्वोच्च न्यायाधीशपदी 'महिला तीन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 02:02 PM2018-08-07T14:02:40+5:302018-08-07T15:26:19+5:30
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज तीन नवीन न्यायाधीशांनी एकत्र प्रवेश केला आहे. न्या. केएम जोसेफ, न्या.विनीत शरण आणि न्या.इंदिरा बनर्जी आजपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. त्यामुळे न्या. इंदिरा बॅनर्जी यांसह सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या तीन झाली आहे.
नवी दिल्ली - देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज तीन नवीन न्यायाधीशांनी एकत्र प्रवेश केला आहे. न्या. केएम जोसेफ, न्या.विनीत शरण आणि न्या.इंदिरा बनर्जी आजपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. न्या. इंदिरा बॅनर्जी यांसह सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी तीन महिलांची नियुक्ती झाली आहे. न्या. आर भानुमति, न्या. इंदु मल्होत्रा आणि न्या. इंदिरा बनर्जी, अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे, आता सर्वोच्च न्यायालयात महिलाराज चालणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी न्या. के.एम.जोसेफ यांचे नावा गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीवर होते. त्यानंतर, आता न्या. इंदिरा बॅनर्जी यांचेही नाव सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या यादीत आले आहे. गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर इंदिरा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आज म्हणून शपथ घेतली. इंदिरा यांनी 5 जुलै 1985 साली आपल्या वकिलीची सनद घेतली. त्यानंतर, कोलकाता येथील सत्र न्यायालयात, उच्च न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. क्रिमीनल लॉसोबतच इंदिरा यांनी इतरही प्रकरणात महत्त्वाचे खटले लढले आहेत. त्यानंतर, 5 फ्रेब्रुवारी 2002 साली त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशपदी कार्यभार स्विकारला. तर, एप्रिल 2017 साली मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यभार स्विकारला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती होणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ 4 वर्षे आणि 1 महिना एवढा असणार आहे.