इतिहास २६ जानेवारीच्या परेडचा
By Admin | Published: January 25, 2016 10:50 PM2016-01-25T22:50:00+5:302016-01-25T22:51:25+5:30
26 जानेवारी म्हटले की, आपल्या नजरेसमोर येते ती दिल्ली येथील गणतंत्र दिवसाची परेड. लहानपणापासून आपण ते बघत आलोय किंबहुना सारे जग ते बघत असते
>- राकेश येरपुडे
26 जानेवारी म्हटले की, आपल्या नजरेसमोर येते ती दिल्ली येथील गणतंत्र दिवसाची परेड. लहानपणापासून आपण ते बघत आलोय किंबहुना सारे जग ते बघत असते. भारताची ताकद व भारताची संस्कृती यात आपल्या भारतीयांच्या भावना जुळलेल्या आहेत. जगावेगळे म्हणजे यामागे सगळ्या जाती व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची कल्पना लपलेली आहे. तसे तर 1950 पासून सुरू असलेल्या या परेडने कितीतरी चढउतार बघितले आहेत व यात कितीतरी गोष्टी सामावून घेतल्या आहेत. भारताकरिता 26 जानेवारी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या दिवसाला आपण गणतंत्र दिवसाच्या रूपात मानतो. या दिवशी आपले संविधान लागू झाले. या दिवसाच्या काही ऐतिहासिक गोष्टी आहेत.
गणतंत्र दिवसाची परेड बघून प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की याची तारीख 26 जानेवारी का ठरवली गेली? यामागे काही आस्था जुळल्या आहेत की काही इतिहाससुद्धा या तारखेमागे आहे? 1930 साली भारत इग्रजांचा गुलाम होता. तेव्हा ना देशाला स्वातंत्र्य मिळालेले होते ना देशाचे दोन तुकडे झालेले होते. 1929चा शेवट व 1930ची सुरुवात. 31 डिसेंबर 1930च्या मध्य रात्री लाहोर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात एक नवीन स्वप्नाची तारीख ठरवली जात होती; व त्यात एक ठराव पारित केला जात होता तो ठराव होता 26 जानेवारी 1930 रोजी इंग्रजांना भारत स्वतंत्र करावा लागेल. असे न झाल्यास 26 जानेवारीला पूर्ण स्वराज्य दिवस साजरा करण्यात येईल. मात्र इंग्रजांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. नंतर 17 वर्षानी 26 जानेवारीला ‘स्वराज्य दिवस’ साजरा करण्याचे सुरू झाले. तो देशातील स्वातंत्र्यसेनानींचा वर्षाचा एक सण झाला. 15 ऑगस्ट 1947ला देशात स्वातंत्र्याचा पहिला सूर्य उगवला. इंग्रजांनी भारताला संपूर्ण स्वतंत्र केले व भारतीय जनतेचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. नंतर 26 जानेवारी ‘स्वराज्य दिवस’ म्हणून साजरा करण्याचा अर्थच संपला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1948 व 1949 असे वर्ष होते तेव्हा 26 जानेवारीला कुठलाच कार्यक्रम झाला नाही. पण, हा उत्सव परतला तोही नव्या रूपात नव्या स्वरूपात. 1950ला अशी वेळ आली की हा दिवस बदलून ‘गणतंत्र दिवस’ झाला. त्या दिवशी सकाळी 10 वाजून 18 मिनिटे झालेली होती तेव्हा 2 वर्षे 11 महिने व 18 दिवसांची मेहनत म्हणजे संविधान लागू करण्यात आले होते. 26 जानेवारीला एक शपथ भारत घेतो ती संविधानातून घेतलेली आहे. तंत्रनिरपेक्ष व लोकतंत्र बनवण्याची. न्याय व विचाराच्या स्वातंत्र्याची व एकता अखंडता राखण्याची. तेव्हा भारताचे संविधान छापण्यात आलेले नव्हते तर ते हस्तलिखित स्वरूपात होते. हिंदी व इंग्रजीत असलेल्या या हस्तलिखिताची मूळ प्रत आजही संसदेच्या लायब्ररीत आहे. या हस्तलिखित प्रतीवर 24 जानेवारी 1950 रोजी जेव्हा हस्ताक्षर करण्यात आले तेव्हा दिल्लीत खूप पाऊस होता, तेव्हा त्याला एक शुभ संकेत मानण्यात आले होते. व त्याच्या 2 दिवसांनंतर 26 जानेवारी 1950 रोजी गणतंत्र दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. त्या दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी गव्हर्मेट हाउसच्या दरबार हॉलमध्ये पहिल्या राष्ट्रपतींच्या स्वरूपात शपथ घेतली व त्यांची पूर्ण टीम 5 कि.मी.चे अंतर पूर्ण करत निर्वान स्टेडियम येथे पोहोचली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज मे. ध्यानचंद स्टेडियम म्हणून ओळखले जाते, जे आज दिल्लीतील हॉकीचे होम ग्राउंड आहे. त्या दिवशी ध्वजाला 31 तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. या आशेने की स्वातंत्र्य चिरायू होवो! पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. ज्यात पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद 6 घोडय़ांच्या बग्गीतून गव्हर्मेट हाउसमधून दुपारी 2.30 वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्युटेन्स झोन यांचा चक्कर मारत त्यांची सवारी स्टेडियमच्या आत पोहोचली व 3.45 वाजता सलामी मंचार्पयत पोहोचली तेव्हा तिरंग्याला 31 तोफांची सलामी देण्यात आली.
31 तोफांचीपण एक कहाणी आहे. 31 तोफांपासून ती 21 तोफांर्पयत आली. असे सांगण्यात येते की, 14 व्या शतकात 21 तोफांची सलामी सुरू करण्यात आली तेव्हा जगाला सौर मंडळाच्या 7 ग्रहांचीच माहिती होती. तेव्हा प्रत्येक 7 व्या दिवशी चंद्राची चाल बदलण्याची माहिती होती; आणि बायबलमध्येही 7 वा दीवस शुभ अशी आस्था प्रबळ होती व आकडा शुभ मानला जात होता. तेव्हा 7च्या गुणोत्तरात तोफांच्या सलामीची प्रथा सुरू झाली; नंतर तोफांच्या सलामीची इंटरनॅशनल संख्या ठरवण्यात आली व भारतात 31ऐवजी 21 तोफांच्या सलामीची परंपरा सुरू झाली. जी आजर्पयत चालू आहे. पण असेही सांगण्यात येते की, ही परंपरा नेव्हीपासून चालू झाली. जेव्हा नेव्हल शिप दुस:या देशाच्या तटावर जात होते तेव्हा 21 तोफांची सलामी देऊन त्या देशाला सांगण्यात यायचे की आमचा हेतू चांगला आहे.
राजपथावर यायला लागली 5 वर्षे
परेड राजपथावर पोहोचायला 5 वर्षे लागली. 1955 पर्यंत गणतंत्र दिवस राजपथावर नव्हे, तर 1954र्पयत कधी किंग्ज् कॅम्प, कधी लाल किल्ला तर कधी रामलीला मैदानात होत होती. वेळ बदलत होता. सर्व देश प्रगतीच्या मार्गावर होते. पण भारत हा खूपच मागास होता. इंग्रजांनी जिथे आपल्याला सोडले होते तिथून मार्ग सोपा नव्हता. जेव्हा पं. नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी बाजूच्या देशांशी व शक्तिशाली राष्ट्रांशी संबंध जोडण्याचे काम सुरू केले. आपल्या देशात पाहुण्यांना मान देणो ही आपली परंपरा आहे. नेहरू सरकारने 26 जानेवारी 1950ला गणतंत्र दिवशी पहिले मुख्य अतिथी बोलाविले व तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. पहिले मुख्य अतिथी म्हणून इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकार्नो भारतात आले होते.
जेव्हा ही परेड राजपथावर पाहायला मिळाली तेव्हा त्यात भव्यता, संस्कृतीची छाप होती; याशिवाय पाकिस्तानविषयीचे प्रेमही आढळून आले. 1947चे ‘घाव’ विसरून आम्ही पाकिस्तानला राजपथाच्या परेडमध्ये सामील करून घेतले. पाकिस्तानचे गव्र्हर्नर जनरल मलीक गुलाम नबी मोहम्मद यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावले.
भारत जलद गतीने प्रगती करू लागला. जगात त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. ज्याची झलक राजपथावर दिसू लागली. 1952 येता येता भारताला नव्या गणतंत्रला नवी ओळख मिळाली होती. तो गणतंत्र समारोह चार दिवस साजरा करण्यात आला. बीटिंग रीट्रीटलाही यात सामील करण्यात आले व त्यानंतर ती परंपराच बनली जी आजही कायम आहे. तेव्हापासून 29 जानेवारीला बीटिंग रीट्रीट समारोहाचे आयोजन केले जाते. फक्त एकदा 26 जानेवारी 2001ला जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा या समारोहाचे आयोजन करण्यात आले नव्हते. या वेळी महात्मा गांधींची आवडीची धून लावण्यात येते. 26 जानेवारीला उंट व घोडे तर आजही दिसतात, पण कधीकाळी यात सजविलेले हत्तीसुद्धा असत. 1956 साली पाच हत्तींना सजवून ही परंपरा सुरू करण्यात आली; आणि 1960 साली बहादूर मुलांना याच हत्तींवर बसवून एक नवीन सुरुवात केली गेली. पण आज हे हत्ती या परेडमधून गायब झालेत.
बालवीर पुरस्काराची कहाणी
26 जानेवारीला लहान मुलांना ‘वीरता पुरस्कार’ देण्यात येतो. वीरता पुरस्काराची सुरुवात पण एका कहाणीने झाली. 2 ऑगस्ट 1957 रोजी जेव्हा नेहरू रामलीला मैदानात होते तेव्हा शॉर्ट सर्किटने स्टेजला आग लागली. त्या वेळी 14वर्षीय हरिश्चंद्रने चाकूने छताचे पडदे कापून हजारो लोकांचा जीव वाचवला. तेव्हापासून वीरता पुरस्काराची सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला 16 वर्षाखालील मुलांना हा पुरस्कार देण्यात येतो. 1962ला जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्याचा परिणाम परेडवरही दिसला. पण तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या सोहळ्याची शान कमी न होऊ देता ते आपल्या मंत्र्यांसोबत या परेडमध्ये सहभागी झाले. त्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथे दिलीप कुमार, तलद मेहमुद व लता मंगेशकर यांना बोलाविण्यात आले होते. 1971ला पाकिस्तानसोबत युद्ध झाले व बांगलादेशची निर्मिती झाली. यात कित्येक भारतीय सैनिक शहीद झाले होते. 1973ला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या शहिदांना अमर जवान ज्योतीद्वारे श्रद्धासुमन अर्पित केले. तेव्हापासून आजही ती ज्योत अखंड तेवत आहे. अमर जवान ज्योतीत एक ज्वाला नेहमीच जळत असते. ही ज्वाला त्या जवानांची आठवण करते ज्यांनी 1971च्या युद्धात आपले प्राण गमावले. मुख्य ज्योतीशिवाय येथे चार कोप-यांवर चार ज्योती आहेत. ज्यां गणतंत्र व स्वतंत्रता दिवशीच चेतविण्यात येतात. कालांतराने येथील इंधनपुरवठय़ातही बदल करण्यात आला आहे. 2006 सालापासून या अखंड ज्योतीसाठी पीएनजीपुरवठा सुरू करण्यात आला व नंतर सीएनजी आल्यावर सीएनजीपुरवठा सुरू करण्यात आल्या.
जी बग्गी समारोहातून गायब झाली होती ती बग्गी 2014 साली परत आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बीटिंग रीट्रीट कार्यक्रमासाठी लिमोझीन कारऐवजी बग्गीत आले ती बग्गी 16व्या शतकात विभाजनाच्या वेळी भारत सरकारने भाग्याच्या जोरावर शिक्का फेकून इंग्रजांच्या जवळून जिंकली होती. भारताच्या गणतंत्र दिवसाशी जुळलेल्या अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या भारताची आण बान शानचे प्रतीक आहेत. ज्याचे सर्व जग वेडे आहे. अशाच या सगळ्यात महान गणतंत्राला संपूर्ण जग सलाम करतेय.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत सहभागी झालेले विविध देशांचे राष्ट्रप्रमुख
सुकार्णो - इंडोनेशिया
राणी एलिझाबेथ - २ - इंग्लंड
गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद - पाकिस्तान
बराक ओबामा - अमेरिका
व्लादिमीर पुतीन - रशिया
हमीद करझाई - अफगाणिस्तान
फ्रँकोई होलांद - फ्रान्स