भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:15 PM2020-09-01T17:15:37+5:302020-09-01T17:32:33+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या हा कुख्यात गुंड 'रेड हिल्स' नावाने ओळखला जातो.
चेन्नई : तामिळनाडूमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षात घेण्यावरून भाजपाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. सूर्या असे नाव असलेला एका हिस्ट्रीशीटरने भाजपाचा सदस्य होण्यासाठी चेन्नई गाठली होती. मात्र, त्याठिकाणी अचानक पोलीस आले. पोलिसांना पाहून सूर्याने तेथून लगेच पळ काढला. दरम्यान, सूर्या बर्याच प्रकरणांमध्ये मोस्ट वॉन्टेड असून पोलीस त्याचा शोध घेत होते, असे सांगण्यात येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या हा कुख्यात गुंड 'रेड हिल्स' नावाने ओळखला जातो. सूर्यावर सहा खून केल्याचा आरोप आहे. याशिवाय, खुनाचा प्रयत्न, स्फोटकांचा वापर यासह अन्य गंभीर कलमांमध्ये जवळपास ५० गुन्हे त्याच्यावर नोंदविण्यात आले आहेत.
सूर्या भाजपात प्रवेश करणार होता. त्यासाठी त्याचा पक्षप्रवेश कार्यक्रम चेन्नईच्या वेंदालुरु येथे होता. याठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल मुर्गन दाखल झाले होते. तसेच, या हिस्ट्रीशीटरची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चेंगळपट्टू जिल्ह्यातील पोलीस सूर्याला अटक करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांच्या टीमला पाहून सूर्या गाडी घेऊन पळून गेला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून अन्य 6 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले लोक सूर्याचे साथीदार आहेत, असे सांगण्यात येते. मात्र, भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून गोंधळ घातला आणि अटक करण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी ज्या सहा लोकांना अटक केली होती. त्यापैकी दोन भाजपाच्या सदस्यांची सुटका करण्याची मागणी करत होते. मात्र, पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांची सुटका केली, असे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस केटी राघवन यांनी याप्रकरणी सांगितले.
आणखी बातम्या...
- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती
- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा
- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल