'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 8 पट अधिक नुकसान भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:28 AM2022-02-28T11:28:32+5:302022-02-28T11:29:19+5:30

Hit & run : 'हिट अँड रन' प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात येणारी भरपाई आता 1 एप्रिलपासून आठ पटीने वाढवून 2 लाख रुपये करण्यात येत आहे. 

‘Hit & run’ solatium raised 8-fold to Rs 2 lakh for death | 'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 8 पट अधिक नुकसान भरपाई!

'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 8 पट अधिक नुकसान भरपाई!

googlenewsNext

नवी दिल्ली : अपघातांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर  'हिट अँड रन' (Hit And Run) प्रकारात मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ होणार आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात येणारी भरपाई आता 1 एप्रिलपासून आठ पटीने वाढवून 2 लाख रुपये करण्यात येत आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मिळणारी नुकसान भरपाई देखील 12,500 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली आहे.

या योजनेला 'हिट अँड रन मोटार अपघात पिडीत भरपाई योजना, 2022 '(Compensation to Victims of Hit and Run Motor Accidents Scheme, 2022) असे म्हटले जाऊ शकते आणि ती 1 एप्रिल 2022 पासून लागू होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, एका प्रसिद्धीपत्रकानुसार, मंत्रालयाने रविवारी सांगितले की, 25 फेब्रुवारी 2022 रोजी हिट अँड रन मोटार अपघातातील पीडितांना भरपाईची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. 

भरपाई 8 पट वाढली
गंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या 25,000 रुपयांवरून 2,00,000 लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की, "ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणारी भरपाई योजना, 1989 ची जागा घेईल." तसेच, प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे आणि पीडितांना मोबदला जाहीर करणे या प्रक्रियेसाठीही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: ‘Hit & run’ solatium raised 8-fold to Rs 2 lakh for death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात