Jammu And Kashmir : मोठं यश! हिज्बुल मुजाहिदीनच्या टॉप कमांडरचा खात्मा, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 05:23 PM2020-11-01T17:23:54+5:302020-11-01T17:33:25+5:30
Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला आहे. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात हिज्बुल मुजाहिद्दीनचे दोन टॉप दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एक जॉईंट ऑपरेशन सुरू केले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले.
We got info last night about a terrorist present at a house in Srinagar.Operation was launched & during encounter today, he was killed. We're 95% certain that he's Hizbul Mujahideen Chief Commander. One suspect arrested. It's a great achievement of our security forces: Kashmir IG pic.twitter.com/3E7DF9ErX2
— ANI (@ANI) November 1, 2020
जॉईंट ऑपरेशनमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडर सैफुल्लाह उर्फ गाजी हैदरचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ऑपरेशन दरम्यान सैफुल्लाह नावाच्या एका कमांडरचा खात्मा केला आहे. त्याची ओळख पटवण्यात येत आहे. मात्र तो 95 टक्के सैफुल्लाह असल्याची आमची खात्री आहे. तसेच एका दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये पाकिस्तानचा गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी युद्धबंदीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील अग्रिम चौक्या तसेच गावांवर गोळीबार केला होता. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकच्या हल्ल्यात भारतीय बाजूने कसलेही नुकसान झालेले नाही. हिरानगर सेक्टरच्या चंदवा, मयारी व फकिरामध्ये पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.