"आता शेवटच्या हल्ल्याची वेळ"; २०२६ पर्यंत नलक्षलवाद संपवण्याची अमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 08:16 PM2024-08-24T20:16:06+5:302024-08-24T20:17:17+5:30

आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

HM Amit Shah said Naxalism will be eradicated from the country by March 2026 | "आता शेवटच्या हल्ल्याची वेळ"; २०२६ पर्यंत नलक्षलवाद संपवण्याची अमित शाहांची घोषणा

"आता शेवटच्या हल्ल्याची वेळ"; २०२६ पर्यंत नलक्षलवाद संपवण्याची अमित शाहांची घोषणा

Amit Shah on Naxalism : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षली चळवळीबाबत मोठं विधान केलं आहे. नक्षलवादामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरुन बोलताना अमित शाह यांना मोठी घोषणा केली. छत्तीसगडमधील दहशतवादग्रस्त भागात सुरक्षा आणि विकास कामांबाबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. २०२६ मध्ये देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी घोषणा यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रायपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी नक्षलवादी हल्ल्यांमध्ये घट झाल्याचे सांगितले. लोकांचा विकासावर विश्वास आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्र नक्षलवाद्यांच्या समस्येपासून मुक्त झाला आहे. नक्षलवादी हल्ल्यांमध्ये ५४ टक्के घट झाली आहे. नक्षलवाद हे लोकशाही व्यवस्थेसाठी सर्वात मोठे आव्हान  आहे. त्यामुळे आम्ही मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवू, असे अमित शाह यांनी म्हटलं.

"नक्षलग्रस्त भागात केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकारच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा भागात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये प्रगती झाली पाहिजे आणि अशा प्रकल्पांदरम्यान येणाऱ्या आव्हानांवर मात केली पाहिजे. नक्षलवादाला तोंड देण्यासाठी निर्दयी राजकारणासोबतच अंतिम हल्ल्याची वेळ आली आहे. नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक हल्ल्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे," असे अमित शाह म्हणाले.

"पहिल्या १० वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये ६६१७ सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक मारले गेले होता. आता हे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे. माझा विश्वास आहे की आमचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला असून मार्च २०२६ पर्यंत आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू शकू. काही ठिकाणी, 3 राज्ये आणि दोन राज्यांचे एक संयुक्त कार्यदल तयार केले गेले आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी फ्रेमवर्क मजबूत केले गेले आहे आणि भारत सरकारच्या यंत्रणा समन्वयासाठी काम करत आहेत. सर्व राज्यांमध्ये आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला संयुक्त टास्क फोर्सचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत," असेही अमित शाह म्हणाले.

"२०२२ हे असे वर्ष आले जेव्हा चार दशकांत प्रथमच मृत्यूची संख्या १०० च्या खाली गेली. २०१४ ते २०२४ या कालावधीत नक्षली घटनांची सर्वात कमी नोंद झाली आहे. टॉप-१४ नक्षलवादी नेत्यांना स्थानबद्द करण्यात आले आहे. याशिवाय डाव्या अतिरेकाऐवजी आम्ही लोकांमध्ये विकासावर विश्वास निर्माण केला आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत अनेक राज्ये नक्षलग्रस्त क्षेत्राच्या प्रभावामधून मुक्त झाली आहेत. महाराष्ट्रातील एक जिल्हा वगळता ही सर्व राज्ये नक्षलमुक्त झाली आहेत," असंही अमित शाह यांनी म्हटलं.

Web Title: HM Amit Shah said Naxalism will be eradicated from the country by March 2026

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.