HMPV Virus : धक्कादायक! चीनमध्ये आढळलेल्या व्हायरसचे एकाच राज्यात दोन रुग्ण सापडले; आरोग्य यंत्रणा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:50 IST2025-01-06T12:45:42+5:302025-01-06T12:50:33+5:30
HMPV Virus : चीनमध्ये आलेल्या HMPV या व्हायरची भारतात एन्ट्री झाली आहे. कर्नाटकात या विषाणूची लागण झालेल्या दोन प्रकरणांची नोंद झाली आहे.

HMPV Virus : धक्कादायक! चीनमध्ये आढळलेल्या व्हायरसचे एकाच राज्यात दोन रुग्ण सापडले; आरोग्य यंत्रणा अलर्ट
HMPV Virus : चीनमध्ये HMPV या व्हायरचे रुग्ण गेल्या काही वाढले आहेत. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, आता या व्हायरचे रुग्ण भारतातही सापडले आहेत. कर्नाटक या एकाच राज्यात दोन रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे की, कर्नाटकमध्ये दोन HMPV संक्रमित आढळले आहेत. एचएमपीव्ही व्हायरल प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग
एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा ८ महिन्यांचा मुलाचा यात समावेश आहे. या विषाणूमुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही.
प्रवासाचा इतिहासही नाही
लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांचा अलीकडील प्रवासाचा इतिहास नाही.त्यामुळे बाहेरच्या देशातून लागण झाली अशी कोणतीही शक्यता नाही.
आरोग्या मंत्रालयाने म्हटले की, देशात ILI आणि SARI प्रकरणांमध्ये कोणतीही असामान्य वाढ झालेली नाही. एचएमपीव्हीचा निर्णय जगभरात आधीच झाला आहे. इतर देशांमध्येही याच्याशी संबंधित आजारांची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत. ICMR आणि IDSP नेटवर्क डेटानुसार, ILI किंवा SARI प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. ILI म्हणजेच इन्फ्लूएन्झा सारख्या आजारात ताप, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. SARI म्हणजे श्वास घेण्यात अडचण. एचएमपीव्ही व्हायरसमध्येही अशीच लक्षणे दिसतात.
मलेशियामध्येही सापडले रुग्ण
मलेशियामध्ये एचएमपीव्ही व्हायरसचे काही रुग्ण समोर आल्यानंतर सरकारने तातडीने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. स्ट्रेट्स टाईम्समधील वृत्तानुसार, मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने लोकांना साबणाने वारंवार हात धुवा, मास्क घाला आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला दिला आहे.