संसदेचे कामकाज चालू देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचीच धरणे
By admin | Published: July 25, 2015 01:13 AM2015-07-25T01:13:31+5:302015-07-25T01:13:31+5:30
संसदेच्या पहिल्या आठवड्यात कुठलेही कामकाज झाले नसताना शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी काँग्रेसशासित राज्यांमधील
नवी दिल्ली : संसदेच्या पहिल्या आठवड्यात कुठलेही कामकाज झाले नसताना शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी काँग्रेसशासित राज्यांमधील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध संसद भवन परिसरात धरणे दिले आणि संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याची मागणी केली.
धरणे आंदोलनात तेलगू देसम पार्टी, अकाली दल,पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे सदस्य सहभागी झाले होते.
संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेली कोंडी फोडण्याची जबाबदारी सरकारची असल्याचा दावा काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कलंकित मंत्र्यांना पदावर कायम ठेवण्याची परंपरा पुढे चालवित आहेत. मुख्यमंत्री असताना गुजरातमध्येसुद्धा त्यांनी असेच केले होते,असा विरोधी पक्षाचा आरोप आहे.
धरणे देण्याऐवजी सरकारने गंभीर आरोप असलेले केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध कारवाई करावी,अशी मागणी बसपा,संयुक्त जनता दल आदी पक्षांनी केली.