CoronaVirus News: बनारसी साड्यांचे माहेरघर बनले कोरोनाग्रस्तांचे आगर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:45 AM2020-05-02T02:45:09+5:302020-05-02T02:45:19+5:30

उत्पादन बंद पडले असून मागणीही नसल्यामुळे विणकरांचे परिवार येणारा दिवस कसा ढकलायचा या विवंचनेत आहेत.

The home of Banarasi sarees became the agar of the coronagrastas | CoronaVirus News: बनारसी साड्यांचे माहेरघर बनले कोरोनाग्रस्तांचे आगर

CoronaVirus News: बनारसी साड्यांचे माहेरघर बनले कोरोनाग्रस्तांचे आगर

Next

लखनौ : उत्तर प्रदेशातले मुबारकपूर हे शहर बनारसी साड्यांसाठी अगदी कालपरवापर्यंत प्रसिद्ध होते. मात्र कोविड-१९ने या शहराची ओळखच बदलली असून आता हे शहर महामारीच्या उत्पाताचा ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. कठोर संचारबंदीचा सामना करावा लागत असल्याने तिथल्या गरीब विणकर आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी येथेही २२ मार्चपासून लॉक डाऊन जारी झाले होते. मात्र त्यानंतर ११ एप्रिल रोजी येथे प्रत्यक्ष संसर्ग झालेल्या काही व्यक्ती आढळल्यानंतर संपूर्ण शहराची नाकेबंदी करण्यात आली आहे. उत्पादन बंद पडले असून मागणीही नसल्यामुळे विणकरांचे परिवार येणारा दिवस कसा ढकलायचा या विवंचनेत आहेत.

Web Title: The home of Banarasi sarees became the agar of the coronagrastas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.