२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

By admin | Published: June 11, 2014 05:50 PM2014-06-11T17:50:55+5:302014-06-11T18:28:32+5:30

भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे.

Home to every Indian by 2022 - Modi | २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११- भारताच्या स्वातंत्र्याला  २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असे भावनिक आवाहनही त्यांनी लोकसभेतील सदस्यांना केले आहे. 
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींचे हे लोकसभेतील पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभेतील पहिल्याच भाषणात मोदींनी त्यांच्या सरकारची दोन प्रमूख उद्दीष्ट मांडले. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाकडे पाणी, वीज, शौचालय अशी मूलभूत सुविधा असलेले घर असायला हवे असा संकल्प मोदींनी केला. तसेच पाच वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीला १५० वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी आपण गांधींजींनी स्वच्छ भारत भेट म्हणून देऊ शकतो असे मोदींनी सांगितले. 
राष्ट्रपतींनी सादर केलेल्या अभिभाषणावर मोदी म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण ही आमच्यासाठी परंपरा नाही. त्यांनी अभिभाषणातून मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची, आश्वासनाची पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. निवडणुकीपूर्वी आपण सर्व उमेदवार होतो. पण लोकसभेत निवडून आल्यावर आपण आशेचे दूत आहोत. राष्ट्रपतींनी मांडलेल्या अजेंड्यातील आश्वासन पूर्ण करण्यास सरकार प्रयत्न करेल. यात काही अडचण आल्यास लोकसभेतील ज्येष्ठ सदस्यांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी आशा दर्शवत त्यांनी विरोधकांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे संकेत दिले. या भाषणात मोदींनी मुसलमान भाई असा उल्लेख करत समाजातील दलित व मुस्लिम समाजाचा विकास व्हायला हवे. समाजातील एक अंग अशक्त राहिल्यास समाज सशक्त होऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
>  देशातील सरकार हे केवळ श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठीही आहे. गरिबांना यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांची अंधश्रध्देतून मुक्तता करण्याची आवश्यकता आहे. 
> देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करायला हवेत.
> महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे रुप दिले होते. त्यानुसार आता विकासाचे जनआंदोलन निर्माण करण्याची गरज. देशातील प्रत्येक व्यक्ती देशासाठी काम करतोय ही भावना निर्माण करायला हवी.  
> बलात्कारसारख्या गंभीर घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे राजकीय नेत्यांनी टाळावे. अशा घटनांवर मनोवैज्ञानिक चर्चा करणे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. 
> भारताची स्कॅम इंडिया ही ओळख पुसून स्किल इंडिया ही नवी ओळख निर्माण करायची आहे. देशात युवकांचा भरणा असल्याने कौशल्यविकासावर भर देण्याची गरज. नुसती पदवी घेऊन पुरेसे नसते. तर त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे. 

Web Title: Home to every Indian by 2022 - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.