मिशन मोड ऑन! अमित शहा पुन्हा सक्रिय; नव्या जबाबदारीसह गृहमंत्री लागले कामाला
By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 01:04 PM2020-11-15T13:04:45+5:302020-11-15T13:05:23+5:30
कोरोनावर मात केलेल्या अमित शहांकडे नवी अन् महत्त्वाची जबाबदारी
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजकीय बैठका, सभांपासून दूर आहेत. कोरोनाची लागण, कोरोनावर मात केल्यानंतर निर्माण झालेल्या समस्या यांच्यामुळे अमित शहा बिहार विधानसबा निवडणुकीपासूनही दूरच होते. मात्र आता अमित शहा सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली असून त्यासाठी त्यांनी आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटवला अमित शहांचा डीपी
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कोरोनाचे सात हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. या परिस्थितीची गृह मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहांनी आज नवी दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.
Union Home Minister Amit Shah has called a meeting later today at North Block to take stock of the COVID-19 situation in Delhi; Union Health Minister Dr Harsh Vardhan, Delhi Lieutenant Governor Anil Baijal, and CM Arvind Kejriwal to be present.
— ANI (@ANI) November 15, 2020
(file pic) pic.twitter.com/qUQgn6bGf2
दिल्लीत काल दिवसभरात ४९ हजार ६४५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राजधानीत कोरोना संक्रमणाचा दर १४.७८ टक्के इतका आहे. काल दिल्लीत ९६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ७ हजार ५१९ वर पोहोचली. दिल्लीत सध्याच्या घडीला ४४ हजार ४५६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ८२ हजार १७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांचं प्रमाण ८९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.