Amit Shah : गुजरात दंगलीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शाह स्पष्टच बोलले, PM मोदींबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 11:37 AM2022-06-25T11:37:56+5:302022-06-25T11:38:13+5:30
Amit Shah Interview Today: एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री शाह म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 18 वर्षांपासून बिष प्राशन करत होते. 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान मी त्यांना अत्यंत जळवून, ते दुःख, त्या वेदना सहन करताना बघितले आहे.
गुजरात दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी वीस वर्षांपूर्वी कशा पद्धतीने कट रचला गेला, यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. एवढेच नाही, तर "पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 18 वर्षांपासून विष प्राशन करत होते, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी विष प्राशन केले -
एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री शाह म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 18 वर्षांपासून विष प्राशन करत होते. 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान मी त्यांना अत्यंत जळवून, ते दुःख, त्या वेदना सहन करताना बघितले आहे. कारण, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, यामुळे सर्व काही खरे असूनही आम्ही काहीही बोललो नाही.
मोदी आणि भाजपविरोधात अपप्रचार -
शाह म्हणाले, मोदी आणि भाजपसंदर्भात जवळपास दोन दशकांपासून अपप्रचार सुरू आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यामुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे, की सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित होते, असे आपण म्हणून शकता, असेही शाह म्हणाले.
'भाजप सरकार आल्यानंतर दंगली बंद झाल्या' -
यावेळी, अमित शाह यांना प्रश्न करण्यात आला, की दंगली झाल्या नंतर, भाजपला फायदा होतो, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. यावर उत्तर देताना शाह म्हणाले, 'या सर्व गोष्टी निरर्थक आहेत, कारण 2002 च्या दंगलीनंतर, गुजरातमध्ये कधीच दंगली झाल्या नाहीत आणि 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही, देशात तशा पद्धतीच्या दंगली झाल्या नाही. कारण, भाजप सरकार आल्यानंतर, दंगे बंद झाले.'
बघा संपूर्ण मुलाखत -
#WATCH LIVE | HM Amit Shah breaks his silence on what happened during the 2002 Gujarat riots. An interview with ANI Editor Smita Prakash. https://t.co/qkX9eAYeG6
— ANI (@ANI) June 25, 2022