Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांची जम्मू-काश्मीर भाजप नेत्यांसोबत बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 08:07 AM2022-08-27T08:07:45+5:302022-08-27T08:09:56+5:30

Union Home Minister Amit Shah : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्याच्या दिवशी भाजपची ही बैठक झाली.

home minister amit shah meets jammu kashmir bjp leaders party organization and political situation discussed | Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांची जम्मू-काश्मीर भाजप नेत्यांसोबत बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांची जम्मू-काश्मीर भाजप नेत्यांसोबत बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Next

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या कोअर ग्रुपच्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत संघटनेशी संबंधित मुद्दे आणि केंद्रशासित प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी नेत्यांना राज्यातील दोन्ही भागात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

केंद्रशासित प्रदेशात जाहीर करण्यात आलेली मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, यंदा निवडणुका होण्याची शक्यता सूत्रांनी फेटाळून लावली आहे. जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशिवाय देवेंद्र सिंह राणा, खासदार जुगल किशोर आणि शक्तीराज परिहार यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.

केंद्रशासित प्रदेशातील पक्षाच्या कामकाजाचे प्रभारी भाजपचे सरचिटणीस तरुण चुग आणि सहप्रभारी आशिष सूद यांनीही बैठकीला हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्याच्या दिवशी भाजपची ही बैठक झाली. गुलाम नबी आझाद हे मूळचे जम्मू-काश्मीरचे आहेत. मात्र, ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. 

भाजप नेत्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील परिसीमन सरावानंतर राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटना या मुद्द्यांवर चर्चा झाली. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही शुक्रवारी अमित शाह यांच्यासोबत भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत म्हणजेच UAPA अंतर्गत नोंदवलेल्या खटल्यांचा आढावा घेतला जाईल आणि त्यांच्या तपासाला गती दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, गृहमंत्र्यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना दहशतवादाची इकोसिस्टम नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: home minister amit shah meets jammu kashmir bjp leaders party organization and political situation discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.