एकाही घुसखोराला देशात थारा देणार नाही - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 06:13 PM2019-09-08T18:13:41+5:302019-09-08T18:23:51+5:30
परिषदेत पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
आसाम : भारतात आता घुसखोरांना स्थान दिले जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. गुवाहाटीमध्ये आयोजित पूर्वोत्तर परिषदेच्या 68 व्या सत्रात संबोधित करताना अमित शाह यांनी आसाममधील अवैध नागरिकांवर निशाणा साधला. अमित शाह पूर्वोत्तर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या परिषदेत पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, 'एनआरसीवर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन आहे.'
Union Home Minister Amit Shah at the 68th Plenary Session of North Eastern Council, in Guwahati: Article 371 of the Indian Constitution is a special provision. BJP government respects Article 371 & will not alter it in any way. #Assampic.twitter.com/Bkbn6824Wf
— ANI (@ANI) September 8, 2019
यावेळी अमित शाह यांनी आसामला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 371 वरही भाष्य केले. कलम 371 ला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते. त्यामुळे यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले.
(आसाममधील एनआरसीची शेवटची यादी प्रसिद्ध, 19 लाख जण बाहेर )
दरम्यान, वैध नागरिकांची आसाममधील एनआरसीची अंतिम यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली आहे . या एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रायब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील, असे सांगण्यात आले आहे.