प्रकृती ठिक होताच अमित शहांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 07:10 PM2020-09-01T19:10:29+5:302020-09-01T19:18:58+5:30

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अमित शहा यांनी हजेरी लावली.

home minister amit shah union cabinet meeting tweets images paid tribute to pranab mukherjee | प्रकृती ठिक होताच अमित शहांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, शेअर केला फोटो

प्रकृती ठिक होताच अमित शहांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, शेअर केला फोटो

Next
ठळक मुद्देअमित शहा यांना सोमवारी एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते. 

अमित शहा यांना सोमवारी एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अमित शहा यांनी हजेरी लावली. यासंदर्भात अमित शहा यांनी ट्विट केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालो. यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, असे अमित शहा यांनी ट्विट करून सांगितले.

अमित शहा यांना सोमवारी एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. ताप आला होता, त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, अमित शहा यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट २ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सामान्यांपासून ते दिग्गजांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १२ दिवसानंतर म्हणजेच १४ ऑगस्टला अमित शहा कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

आणखी बातम्या...

- Gold-Silver Price : सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीत 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ, पाहा आजचे दर

- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल   

Web Title: home minister amit shah union cabinet meeting tweets images paid tribute to pranab mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.