गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:26 AM2024-06-23T08:26:26+5:302024-06-23T08:30:14+5:30

काही दिवसातच देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. देशातील काही भागात पावसामुळे मोठे नुकसान होत असते, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह आज बैठक घऊन आढावा घेणार आहेत.

Home Minister Amit Shah will hold a high-level meeting today Preparedness to deal with flood situation will be reviewed | गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार

गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार

काही दिवसातच देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. देशातील काही भागात पावसामुळे मोठे नुकसान होत असते, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह आज बैठक घऊन आढावा घेणार आहेत. या बैठकीत पुराचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

प्रत्येक वर्षी मान्सूनच्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते बिहार, आसाम आणि इतर पूर्वेकडील राज्यांचा मोठा भाग पाण्याखाली जातो. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि इतर काही राज्यांना पावसाळ्यात भूस्खलन आणि पावसाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

जीएसटी खटल्यात अधिकाऱ्यांच्या अपिलांसाठी आर्थिक मर्यादा निश्चित

देशातील पूर व्यवस्थापनाच्या एकूण तयारीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह रविवारी एका उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिलेली माहिती अशी, राज्यात गेल्या २४ तासांत दोन मृत्यूची नोंद झाली असून, यावर्षीच्या पूर, भूस्खलन आणि वादळात मृतांची संख्या ३९ झाली आहे.

मात्र, राज्यातील पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. सध्या १२ जिल्ह्यांमध्ये २,६३,४५२ लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात १३४ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यामध्ये १७,६६१ लोकांना आश्रय देण्यात आला आहे.

आसाममध्ये पावसामुळे मोठं नुकसान
 
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारीही येथील पूरस्थिती गंभीर होती. अनेक जिल्ह्यांतील चार लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोपिली, बराक आणि कुशियारा यासह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. १९ जिल्ह्यांतील सुमारे चार लाख लोकांना पूरग्रस्त भागात राहावे लागत आहे. या जिल्ह्यांमध्ये बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचार, दररंग, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, करीमगंज, कोक्राझार, लखीमपूर, नागाव, नलबारी, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर आणि उदलगुरी यांचा समावेश आहे.

आसामच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे करीमगंजला सर्वाधिक फटका बसला. येथे दोन लाख लोक बाधित झाले. यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळात मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे. राज्यभरात १०० हून अधिक मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या छावण्यांमध्ये सुमारे १४ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे.
 

Web Title: Home Minister Amit Shah will hold a high-level meeting today Preparedness to deal with flood situation will be reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.