अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 08:09 PM2024-01-01T20:09:38+5:302024-01-01T20:13:28+5:30

या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि सुरक्षा ग्रीड आणि शून्य दहशतवादी योजना यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

Home Minister Amit Shah will hold a high-level security review meeting; Discussions will be held on various issues including Zero Terrorism Plan | अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा

अमित शाह घेणार उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; शून्य दहशतवादी योजनेवर होणार चर्चा

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्या राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि सुरक्षा ग्रीड आणि शून्य दहशतवादी योजना यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

अमित शाह या बैठकीत सुरक्षा ग्रीडचे कार्य आणि सुरक्षा तसेच केंद्रशासित प्रदेशातील विकास उपक्रमांशी संबंधित विविध कामांचा आढावा घेतील. तसेच एरिया डोमिनेशन प्लॅन, झिरो टेरर प्लॅन, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, UAPA आणि इतर सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा देखील अमित शाह आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

सदर बैठकीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्य सचिव अटल दुल्लू आणि पोलिस महासंचालक आरआर स्वेन उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक, तसेच गृह मंत्रालय आणि जम्मूचे संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षी १३ जानेवारीला ही बैठक झाली होती

गेल्या वर्षी १३ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर अशाच प्रकारच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अमित शाह यांनी नेतृत्व केले होते. यावेळी सरकारच्या नेतृत्वाखालील दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेच्या धोरणानुसार, सर्व सुरक्षा यंत्रणा सामना करण्याच्या दिशेने काम करत असल्याचं अमित शाह म्हणाले. दहशतवाद्यांचे समर्थन आणि माहितीचे जाळे नष्ट करण्यासाठी ३६० डिग्री सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत केली जाईल, असेही ते म्हणाले. 

Web Title: Home Minister Amit Shah will hold a high-level security review meeting; Discussions will be held on various issues including Zero Terrorism Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.