दिल्लीतल्या हिंसेत शहीद पोलिसाच्या पत्नीला अमित शाहांनी लिहिलं पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 09:22 PM2020-02-25T21:22:43+5:302020-02-25T21:39:40+5:30
अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते.
केंद्रीय गृहमंत्री पत्रात लिहितात की, तुमचे पती एक आदर्श पोलीस होते. ज्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले होते. खर्या सैनिकाप्रमाणे त्यांनीही या देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. तुम्हाला दु:ख आणि अकाली नुकसान सहन करण्याची देवानं शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश तुमच्या कुटुंबासमवेत आहे.
हिंसाचारादरम्यान दगडफेक झाल्यानं पोलीस कर्मचारी जखमी झाला. रतनलाल मूळचा राजस्थानच्या सीकरचा असून 1998मध्ये दिल्ली पोलिसात हवालदार पदावर दाखल झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तिन्ही मुले आता शिकत आहेत. रतनलालची आई संतरा देवी आणि भाऊ दिनेश गावी कुटुंबासमवेत राहतात. त्याचा एक भाऊ बंगळुरूमध्ये राहतो.Home Minister Amit Shah writes a letter to wife of Delhi Police Head Constable Ratan Lal, who died during clashes over Citizenship Amendment Act in Northeast Delhi, yesterday. He writes, "I express grief & deep condolences on untimely death of your husband". #DelhiViolencepic.twitter.com/ZP3nJT9Fzn
— ANI (@ANI) February 25, 2020
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हिंसाचारामुळे आतपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 150 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.