प्रसंगी सीमेपलीकडेही धडक देऊ - गृहमंत्री राजनाथ सिंह; पाकिस्तानला दिला खणखणीत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:54 PM2018-03-17T23:54:36+5:302018-03-17T23:54:36+5:30
जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळा करू शकत नाही, अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची ताकद आमच्यात आहेच, परंतु प्रसंगी आम्ही सीमेपलिकडेही धडक देऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. एका कार्यक्रमात बोलत होते.
नवी दिल्ली : जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळा करू शकत नाही, अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची ताकद आमच्यात आहेच, परंतु प्रसंगी आम्ही सीमेपलिकडेही धडक देऊ शकतो, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. एका कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले की, अतिरेक्यांना मदत करणे थांबविल्यास पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. परंतु मैत्रीच्या प्रस्तावाला पाकिस्तान सकारात्मक प्रतिसाद देत नाही. उलट संयुक्त राष्ट्रसंघाने दहशवादी घोषित केलेला मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा उदोउदो करीत आहे.
काश्मीर प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आम्ही कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. संवादासाठीच आम्ही दिनेश्वर शर्मा यांची वार्ताकार म्हणून नियुक्ती केली आहे. शर्मा यांनी या मुद्द्याशी संबंधित सर्वांशी चर्चा सुरु केली आहे, असे सांगून ते म्हणाले की, काश्मीरचे तरुण आमचे आहेत, कुणीही बुद्धीभेद करून त्यांना कट्टरपंथाकडे वळवू नये. निरपराध काश्मिरी तरुणांनी आधी इस्लाममधील जिहादची संकल्पना नीट समजून घ्यावी.
या वर्षात २काश्मीर सरकारने दगडफेकीचे ९७३० गुन्हे मागे घेतल्याच्या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले की, हे सर्व जण तरुण होते. कुणाच्या तरी प्रभावाखाली येऊन त्यांनी हे कृत्य केले. त्यांना दुसऱ्या वेळेस माफ केले जाणार नाही.
बंदुकीची गोळी हे उत्तर नव्हे
माओवाद्यांवर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी
यावेळी दिली. ते म्हणाले की, बंदूकीच्या गोळ््या हे नक्षलवादावरील उत्तर नव्हे. नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही विकासापासून दूर असलेल्या घटकांसाठी विविध उपक्रम सुरु करीत आहोत.