CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 09:45 AM2020-09-16T09:45:12+5:302020-09-16T09:49:13+5:30
कोरोनामुळे सर्वच व्यवसायांवर मोठे संकट कोसळले आहे. मार्चपासून गेले सहा-सात महिने चित्रपटगृह बंद आहेत
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांवर मोठे संकट कोसळले आहे. मार्चपासून गेले सहा-सात महिने चित्रपटगृह बंद आहेत. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देशभरात 1 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये गृह मंत्रालयाने काही कडक नियमांसह 1 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे. भारत सरकारचं अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या दाव्याबाबत तपास केला सत्य समोर आलं आहे. त्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
Claim:A Media report has claimed that Home Ministry has ordered reopening of cinema halls across the country from 1st October with the imposition of strict regulations. #PIBFactCheck: This claim is #Fake. No decision has been taken by @HMOIndia on reopening the cinema halls yet pic.twitter.com/hc903cfXnm
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 14, 2020
चित्रपटगृह, स्विमिंग पूल 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद
पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने चित्रपटगृह पुन्हा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं म्हटलं आहे. अनलॉक 4.0 मध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र चित्रपटगृह, स्विमिंग पूल आणि थिएटर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनानंतर देखील प्रेक्षक चित्रपटगृहाकडे लगेचच वळण्याची शक्यता कमी आहे. ओटीटी वगैरे सारखी नवीन करमणुकीची माध्यम उपलब्ध झाली आहेत.
CoronaVirus News : जगभरात कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू पण...https://t.co/5g7hz138RG#coronavirus#CoronaUpdates#COVID19#CoronaVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2020
एकपडदा चित्रपटगृहे बंद करुन इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्र्यांना निवेदन
एकपडदा चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यानंतरही तग धरुन राहणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने एकपडदा चित्रपटगृहे बंद करुन त्या जागेत दुसरा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे एक्झिबिटर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. चित्रपटगृहे चार महिन्यांपासून बंद आहेत. तरीही कर्मचाऱ्यांचे पगार, साफ सफाई यावर महिना 30 ते 50 हजार रुपये खर्च करावा लागत आहे. यासाठी व्यावसायिकांनी बँकेचे कर्ज काढले आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त या परिस्थितीला तोंड देत सुरू ठेवलेला व्यवसाय यापुढे करायचा की नाही, या विचारापर्यंत चित्रपटगृहांचे मालक आले आहेत.
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी देणार नोकरी, एका तासाला मिळणार 'इतके' पैसेhttps://t.co/ZaEr3fk40e#Jobs
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Apple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"
डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा
तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी