मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद, गृहमंत्रालयाचे आदेश
By पूनम अपराज | Published: January 26, 2021 03:51 PM2021-01-26T15:51:02+5:302021-01-26T15:51:43+5:30
Farmers Tractor Rally : पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपतीभवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. आताची चिघळलेली परिस्थिती पाहता गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, नांगलोई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपतीभवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Internet services snapped in some parts of Delhi-NCR in view of the prevailing law and order situation. pic.twitter.com/5rcHwb27qY
— ANI (@ANI) January 26, 2021
Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून 'त्या' वृद्धाने पोलिसाला सुखरूप काढले बाहेर
आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र हे हिंसक आंदोलन अजून पेटू नये म्हणून अफवांना आळा बसावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून संबंधित भागातील इंटरनेट सेवा आणि टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहील.
लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा
Video : शेतकऱ्यांचा संघर्ष पेटला! शेतकरी आंदोलकाकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे.