यापुढे ६० पेक्षा जास्त व्हीआयपी सुरक्षेविना गृहमंत्रालयाचा निर्णय : महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश
By Admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:45+5:302015-09-03T23:52:45+5:30
सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण,
स शीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची सुरक्षा काढली......................संपुआच्या काळातील ६० पेक्षा जास्त व्हीव्हीआयपींची सुरक्षा हटविली...........नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : संपुआच्या काळातील ६० पेक्षा जास्त व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. देशभरातील व्हीआयपींना पुरविलेल्या सुरक्षेचा आढावा घेताना केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठ्या प्रमाणात फेरबदलाची प्रक्रिया अवलंबली आहे. महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सुरक्षा कवच असलेल्या यादीतून वगळण्यात आले आहे.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नातेवाईक, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) दिल्या जाणार्या सुरक्षेचा दर्जा कमी करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि स्मृती तसेच जावई आणि अन्य कुटुंबियांना यापुढे कोणतीही सुरक्षा असणार नाही. गृहमंत्रालयाने २१ ऑगस्ट रोजी व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा बारकाईने आढावा घेतला. ------------------------------अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांना फटका संपुआ सरकारमधील अनेक माजी केंद्रीय मंत्री आणि घटनात्मक पदे भूषविणार्या अधिकार्यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा निम्नस्तराची असेल. त्यांना दिल्लीत स्वीय सुरक्षा अधिकारी मिळेल. तसेच मतदारसंघांमध्ये त्यांच्या सोबत तीनपेक्षा जास्त सुरक्षारक्षक असणार नाहीत. सुबोधकांत सहाय, श्रीप्रकाश जयस्वाल, कमलनाथ, जितीन प्रसाद, व्ही. नारायणस्वामी, अंबिका सोनी, मनीष तिवारी, आर.के. धवन, माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम आदींचा त्यात समावेश आहे. माजी संरक्षणमंत्री ए.के. ॲन्टनी, आरपीएन सिंग, जितेंद्रसिंग यांच्यासारख्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारची सुरक्षा नाकारली आहे. माजी मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ, माजी गृहसचिव अनिल गोस्वामी, मणिपूरचे माजी राज्यपाल व्ही.के. दुग्गल आणि त्यांचे कुटुंबीय, मनमोहनसिंग यांचे माजी सल्लागार टीकेए नायर, नवीन जिंदल, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल तेजिंदर खन्ना आदींची सुरक्षा काढून घेण्यात आली किंवा कमी केली आहे. -------------------------------वड्रांची विशेष सुरक्षा काढणार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांची एनएसजी सुरक्षाही कमी करण्याचा विचार केला जात आहे. वड्रा यांना यापूर्वी कोणत्याही विमानतळावर अंगझडती किंवा सुरक्षा तपासणीतून जावे लागत नव्हते. त्यांचा हा विशेष दर्जा अलीकडेच काढून घेण्यात आला. त्यांना सीआयएसएफची सुरक्षा दिली जाईल. मात्र, त्यात चारपेक्षा जास्त जवान असणार नाहीत. या जवानांचे वेतनही त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.............