काश्मीरसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, 8 ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 09:04 PM2019-08-12T21:04:58+5:302019-08-12T21:05:30+5:30

केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे.

home secretary closure of few twitter accounts spreading rumors jammu and kashmir | काश्मीरसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, 8 ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस

काश्मीरसंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई, 8 ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस

googlenewsNext

नवी दिल्लीः केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे. यात जवळपास आठ जणांच्या ट्विटर अकाऊंट्सचा समावेश आहे. ज्या खात्यांना बंद करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, त्यात @kashmir787-Voice of Kashmir, @Red4Kashmir-MadihaShakil Khan, @arsched-Arshad Sharif, @mscully94-Mary Scully, @sageelaniii-Syed Ali Geelani, @sadaf2k19, @RiazKha61370907 आणि RiazKha723चा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधून काही दिवसांपूर्वीच अनुच्छेद 370 हटवण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भात व्हायरल होणाऱ्या गोष्टींकडे सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. जेणेकरून काश्मीर घाटीमध्ये शांततेचं वातावरण राहील. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये काही संघटना दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचीही माहितीही समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही हाय अलर्ट जारी केला आहे. 
भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदला हिरवा कंदील दाखवला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेला मसूद अजहर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे. जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा भागांमध्ये हल्ले करा, अशी सूचना आयएसआयकडून जैशला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घुसखोर दहशतवादी एखाद्या मशिदीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी मिळेल, असा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असावेत, अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली. 'सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालयं लक्ष्य केली जाऊ शकतात,' असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला. 
 

Web Title: home secretary closure of few twitter accounts spreading rumors jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.