गृहमंत्र्यांचा पाकवर ठपका

By admin | Published: June 27, 2016 04:09 AM2016-06-27T04:09:38+5:302016-06-27T04:09:38+5:30

पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला.

Homemade Pak Paksha | गृहमंत्र्यांचा पाकवर ठपका

गृहमंत्र्यांचा पाकवर ठपका

Next


फतेहगड साहिब (पंजाब) : आपला शेजारी देश भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला. सीआरपीएफच्या आठ जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना काही चुका झाल्या किंवा काय, याचा तपास करण्यासाठी एक समिती पाम्पोर येथे पाठविण्यात येईल, असेही राजनाथ सिंह यांनी जाहीर केले.शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याबद्दल राजनाथसिंग यांनी सुरक्षा दलांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, काही चुका झाल्या काय याचा तपास करण्यासाठी दोन सदस्यांचे पथक पाम्पोर येथे पाठविण्यात यावे, असे निर्देश गृह सचिवांना दिले आहेत. भविष्यात अशा चुका होऊ नयेत आणि अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये आमच्या जवानांवर शहीद होण्याची पाळी येऊ नये यासाठी हे पथक जाणार आहे. ‘आमच्या शूर जवानांचे मी कौतुक करतो. त्यांच्या शौर्याला माझा सलाम. दहशतवाद्यांनी धूर्तपणे जवानांवर हल्ला केला. परंतु आमच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना यशस्वीपणे टिपले,’ असे राजनाथसिंग म्हणाले. पंजाबच्या फतेहगड साहिब येथे रविवारी शीख योद्धा बाबा बंदासिंग बहादूर यांच्या ३०० व्या हुतात्मा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (वृत्तसंस्था)
>पाम्पोर हल्ला हा काश्मीरला बदनाम करण्यासाठीच
पाम्पोरसारखे दहशतवादी हल्ले काश्मीरला बदनाम करण्यासाठीच घडविण्यात येतात. संभाव्य गुंतवणूकदार आणि पर्यटकांना येथे येण्यापासून रोखणे हा अशा हल्ल्यांमागचा हेतू आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मुफ्ती यांनी पाम्पोर हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या आठ जवानांना श्रद्धांजली वाहिली.
आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविणे निषेधार्ह आहे. हा रमजानचा पवित्र महिना आहे. या महिन्यात लोक क्षमाशील असतात आणि घडलेल्या पापाची क्षमा मागतात. आपल्याकडून कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा हा महिना आहे. अशा हल्ल्यांमधून काहीही साध्य होणार नाही. केवळ काश्मीरची बदनामी होईल, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Homemade Pak Paksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.