घरकुल लाभार्थ्यास अनुदान मिळेना आनंदवाडी : जुने घरही मोडले

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:27+5:302016-10-30T22:46:27+5:30

मसलगा : इंदिरा आवास योजनेअंतर्गत आनंदवाडी गौर येथील एकास घरकुल मंजूर झाले. पंचायत समितीच्या अभियंत्याने जागेचे मार्कआऊटही करून दिले. त्यामुळे सदरील लाभार्थ्याने जुने घर पाडले. मात्र अनुदानच न मिळाल्याने अद्यापही घरकुल तयार झाले नाही. त्यामुळे सदरील लाभार्थ्यास उघड्यावर रहावे लागत आहे.

Homework beneficiary gets subsidy: Anandawadi: Old house breaks | घरकुल लाभार्थ्यास अनुदान मिळेना आनंदवाडी : जुने घरही मोडले

घरकुल लाभार्थ्यास अनुदान मिळेना आनंदवाडी : जुने घरही मोडले

Next
लगा : इंदिरा आवास योजनेअंतर्गत आनंदवाडी गौर येथील एकास घरकुल मंजूर झाले. पंचायत समितीच्या अभियंत्याने जागेचे मार्कआऊटही करून दिले. त्यामुळे सदरील लाभार्थ्याने जुने घर पाडले. मात्र अनुदानच न मिळाल्याने अद्यापही घरकुल तयार झाले नाही. त्यामुळे सदरील लाभार्थ्यास उघड्यावर रहावे लागत आहे.
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर येथील प्रकाश तगडपल्ले यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले. त्यांना ग्रामपंचायतीने घरकुल मंजुरीची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी स्वत:चे मातीचे घर पाडले. दरम्यान, पंचायत समितीच्या अभियंत्याने जागेची पाहणी करून मार्कआऊट करून दिले. घरकुलासाठी पाया खोदला. पण त्यानंतर अनुदानच देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू झाली. त्यामुळे तगडपल्ले यांचा संसार उघड्यावरच पडला आहे.
तगडपल्ले हे सालगडी म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत प्रशासनानेही त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर झाल्याची माहिती दिल्याने आठ महिन्यांपूर्वी आपण घर पाडले. मात्र संबंधित अधिकारी केवळ चौकशी करून सांगतो, असे म्हणत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रकाश तगडपल्ले यांनी दिली.
या संदर्भात निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्कावार म्हणाले, या संदर्भात चौकशी करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Web Title: Homework beneficiary gets subsidy: Anandawadi: Old house breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.