बाबो! डान्स करता करता 2 मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले; मंदिरामध्ये जाऊन गुपचूप केलं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:57 PM2022-08-19T14:57:35+5:302022-08-19T15:03:34+5:30

एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात डान्स करता करता दोन तरूण एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन लग्नही केलं.

homosexual marriage of two boys in khagaria bihar family refused to accept | बाबो! डान्स करता करता 2 मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले; मंदिरामध्ये जाऊन गुपचूप केलं लग्न अन्...

बाबो! डान्स करता करता 2 मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले; मंदिरामध्ये जाऊन गुपचूप केलं लग्न अन्...

Next

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे भन्नाट किस्से हे अनेकदा समोर येत असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. दोन मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मंदिरामध्ये जाऊन गुपचूप लग्न केल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या खगडियामध्ये ही हैराण करणारी घटना घडली आहे. एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात डान्स करता करता दोन तरूण एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन लग्नही केलं. पण जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना या लग्नाची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी विरोध केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, झमटा गावात ऑर्केस्ट्रामध्ये डान्सर म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांचा एकमेकांवर जीव जडला. ते एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले की त्यांनी थेट लग्नच करण्याचा निर्णय घेतला. अनंत आणि दिनेश या दोघांनी पूर्णिया येथील एका मंदिरात जाऊन लग्न केलं. सप्तपदीही घेतले. पण जेव्हा ते आपल्या घरी आले तेव्हा त्यांना पाहून झमटा गावातील लोक हैराण झाले. 

गावकऱ्यांना त्यांच्या विवाहाला मान्यता दिलीच नाही. यातील एक तरूण तर एका मुलाचा बाप असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही तरुणाच्या कुटुंबीयांना या घटनेनंतर मोठा धक्का बसला आहे. त्यांना हे लग्न मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा देखील रंगली आहे. कुटुंबीयांना टोकाचा विरोध केल्यानंतर हे दोघेही आपापल्या गावात असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: homosexual marriage of two boys in khagaria bihar family refused to accept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न