२५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:11 AM2020-12-24T06:11:46+5:302020-12-24T07:11:59+5:30

Agriculture Minister Narendra Tomar : माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारतर्फे सुशासन दिवस पाळला  जातो. याच दिवशी पंतप्रधान एका  क्लिकने पैसे थेट खात्यामध्ये पाठविणार असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले.

Hon'ble farmers will be given installment scheme on December 25 - Agriculture Minister Narendra Tomar | २५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर

२५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजारांचा सातवा  हप्ता  २५ डिसेंबरला  शेतकऱ्यांच्या  खात्यात थेट जमा होणार आहे.  सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांना या  योजनेचा थेट लाभ होत आहे. 
माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारतर्फे सुशासन दिवस पाळला  जातो. याच दिवशी पंतप्रधान एका  क्लिकने पैसे थेट खात्यामध्ये पाठविणार असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेचा दोन  हजार रुपयांचा पुढचा हप्ता २५ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट  जमा होणार आहे. देशभरात १४ कोटी शेतकरी असून, त्यापैकी ११ कोटी ४ लाख शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. 

Web Title: Hon'ble farmers will be given installment scheme on December 25 - Agriculture Minister Narendra Tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.