हनी ट्रॅप प्रकरण : "त्या" महिलेला अटक
By admin | Published: May 2, 2017 12:07 PM2017-05-02T12:07:07+5:302017-05-02T12:07:07+5:30
भारतीय जनता पार्टीचे खासदार के. सी. पटेल यांनी एका महिलेविरोधात हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या महिलेला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 02 - भारतीय जनता पार्टीचे खासदार के. सी. पटेल यांनी एका महिलेविरोधात हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या महिलेला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
के.सी.पटेल हे गुजरातच्या वलसाड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत. के.सी. पटेल यांनी एका महिलेने आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करत गेल्या आठवड्यात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, संबंधित महिलेने सुद्धा के. सी. पटेल यांच्यावरच बलात्काराचा आरोप केला आहे. पेशाने वकील असलेल्या त्या महिलेने सांगितले की, खारदार के. सी. पटेल यांचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू होता. त्यादरम्यान माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर के. सी. पटेल डिनरच्या निमित्ताने गाझियाबादमधील माझ्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत जोरजबरदस्तीने बलात्कार केला आणि तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे त्या महिलेने म्हटले आहे. तसेच, धमक्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी पुरावा म्हणून मला सीडी बनवावी लागली, असेही त्या महिलेने म्हटले आहे.
यावर खासदार के. सी. पटेल आणि दिल्ली पोलिसांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. सदर महिलेने यापूर्वी हरयाणातील एका खासदाराविरोधात तिलक मार्ग पोलिस स्थानकात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्या महिलेला तिच्या गाझियाबादमधील घरातून अटक केली असून ती याआधी सुद्धा अशाच एका प्रकरणात अडकली होती, असे पोलिसांनी म्हटले आहे.