'राम रहीमच्या मदतीने हनीप्रीतला जन्माला घालायचं होतं मूल, डेराचा उत्तराधिकारी बनवण्याची होती इच्छा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 13:55 IST2017-09-26T13:54:47+5:302017-09-26T13:55:32+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम आणि हनीप्रीतच्या संबंधांवरील पडदा उठू लागला आहे. राम रहीम आणि हनीप्रीतसंबंधी अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

'राम रहीमच्या मदतीने हनीप्रीतला जन्माला घालायचं होतं मूल, डेराचा उत्तराधिकारी बनवण्याची होती इच्छा'
चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम आणि हनीप्रीतच्या संबंधांवरील पडदा उठू लागला आहे. राम रहीम आणि हनीप्रीतसंबंधी अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीम आणि हनीप्रीतला मूल जन्माला घालायचं होतं. दोघांची इच्छा होती एकी मूल आपण जन्माला घालावं, आणि तो मुलगाच असावा. याच मुलाच्या हाती डे-याची सुत्रं द्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, डे-यामधील एका साधकानेच हा खुलासा केला आहे.
डे-यातील साधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हनीप्रीत राम रहीमची भक्त होण्याआधी तिच्यासोबतही तेच झालं होतं जे राम रहीमने आरोप करणा-या दोन साध्वींसोबत केलं होतं. हनीप्रीतदेखील राम रहीमच्या बलात्काराला बळी पडली होती असं साधकांनी सांगितलं आहे. गुहेत तिच्यावर राम रहीमने बलात्कार केला होता. पण हनीप्रीतने कायदेशीर मार्ग न अवलंबता राम रहीमला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, आणि आपल्याला हवं ते करुन घेतलं.
गुरमीत राम रहीमचा माजी ड्रायव्हर आणि त्यांचा मुलगा गुरदास याने आरोप केला आहे की, त्यांनी हनीप्रीतला गुहेत जाताना पाहिलं होतं. बाहेर येताना हनीप्रीत रडत होती. त्यावेळी आपण आणि आपला एक नातेवाईक गुहेची सुरक्षा करत होता असा दावा गुरुदासने केला आहे. गुरुदासने सांगितलं की, 'हनीप्रीत संतापली होती आणि तिने तिथेच कॅशिअर म्हणून काम करणा-या आपल्या आजोबांकडे याची तक्रार केली. त्यांनी राम रहीमवर आपला राग काढला. पण राम रहीमने गुंड पाठवत त्यांचा आवाज दाबला'.
यानंतर राम रहीम आणि हनीप्रीत पुन्हा जवळ आले. दोघांनी मूल जन्माला घालत त्यालाच डे-याचा उत्तराधिकारी करायचं असं ठरवलं होतं. पण गेल्या महिन्यात झालेल्या कारवाईमुळे त्यांचा प्लान फसला.
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सध्या राम रहीम रोहतक कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.