अमिताभ, कंगना यांचा सन्मान
By admin | Published: May 4, 2016 03:18 AM2016-05-04T03:18:49+5:302016-05-04T03:18:49+5:30
अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेतार व कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने येथे
नवी दिल्ली : अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेतार व कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने येथे दिमाखदार सोहळ््यात गौरविण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे ६३ व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण मंगळवारी झाले.
मनोज कुमार यांना सुवर्ण कमळ व रोख दहा लाख रुपये असा चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च व मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रजत कमळ व ५० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. यापूर्वी बच्चन यांनी १९९० (अग्निपथ), २००५ (ब्लॅक) आणि २००९ मध्ये (पा) हा पुरस्कार मिळविला होता. ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. रजत कमळ व ५० हजार रुपये रोख असे त्याचे स्वरुप आहे. यापूर्वी कंगनाने ‘फॅशन’ आणि ‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकांसाठी हा पुरस्कार मिळविला होता.
‘बाहुबली’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार मिळविला. दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि निर्माते शोभू यारलागद्दा आणि प्रसाद देवीनेनी यांनी सुवर्ण कमळ, प्रमाणपत्र आणि रोख असा हा पुरस्कार स्विकारला. संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. सुवर्ण कमळ, प्रमाणपत्र आणि रोख अडीच लाख रुपये असा हा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट मनोरंजन वर्गात ‘बजरंगी भाईजान’ ने पुरस्कार मिळविला.
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त कलाकृती व कलाकार
सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : बाहुबली
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी
(बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत
(तनु वेड्स मनु रिटर्नस्)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : समुथीराकणी (विसरनाई)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : गौरव मेनन (बेन)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : दुरांतो
मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट :
बजरंगी भाईजान
सामाजिक विषयावरील सर्र्वोत्कृष्ट चित्रपट : निर्णायकम
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : वलिया चिराकुल्लू पक्षीकाल
सर्वोत्कृष्ट संपादन : लेफ्ट. टी. ई. किशोर (विसरनाई)
पदार्पणातील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा इंदिरा गांधी पुरस्कार : नीरज घायवान (मसान)
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार : नानकशाह फकीर
सर्वोत्कृष्ट रंगभूषा : नानकशाह फकीर
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : एम. जयचंद्रन (कथिरुन्नू कथिरुन्नू ईन्नू निंते मोईदीन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : इलिया राजा
(थराई थप्पट्टाई)
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक : मोनाली ठाकूर
(मोह मोह के धागे- दम लगा के हय्या)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : महेश काळे
(कट्यार काळजात घुसली)
बेस्ट ज्युरी अवॉर्ड : कल्की कोचलीन
(मार्गारिटा विद ए स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट गीतकार : वरुण ग्रोव्हर
(मोह मोह के धागे- दम लगा के हय्या)
सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी : रेमो डिसोझा (दिवानी मस्तानी-बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी : सुदीप चॅटर्जी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) : जुही चतुर्वेदी (पिकू), हिमांशू शर्मा (तनु वेड्स मनु रिटर्नस्)
सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद (जुही चतुर्वेदी (पिकू), हिमांशू शर्मा (तनु वेड्स मनु रिटर्नस्)
स्पेशल मेन्शन : रितिका सिंह
(इरुधी सुत्रू (साला खडूस)
स्पेशल मेन्शन : जयसूर्या
(सू सू सुधी वथमीकम आणि लुका छुपी)
स्पेशल मेन्शन : रिंकू राजगुरू (सैराट)
बेस्ट फिल्म फ्रेंडली अवॉर्ड : गुजरात
बेस्ट फिल्म फे्रंडली अवॉर्ड : स्पेशल मेन्शन टू उत्तर प्रदेश आणि केरळ
च्सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : कोथनोदी
च्सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट : शंखचील
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : दम लगा के हय्या
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : तिथी
सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : एनिमी
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : पथेमारी
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : रिंगण
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट : पहादा ला लुहा
सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट : विसरनाई
सर्वोत्कृष्ट संस्कृत चित्रपट : प्रियमानसम
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट : मिथिला मखान
सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट : कांची
सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट : इबुसु याओहानबियु
सर्वोत्कृष्ट वांछू चित्रपट : द हेड हंटर
सर्वोत्कृष्ट बोडो चित्रपट : दाऊ हुदुनी मेथाई
सर्र्वोत्कृष्ट हरयाणवी चित्रपट : सतरंगी
सर्वोत्कृष्ट खासी चित्रपट : ओनाताह
सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म :
अमदावद मा फेमस
सर्वोत्कृष्ट आर्ट कल्चर फिल्म :
ए फार आफ्टरनून -ए पेंटेड सागा
बेस्ट बायोग्राफिकल : लाईफ इन मिठापूर
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन फिल्म : अवसाद
बेस्ट अॅनिमेशन अवॉर्ड : फिशरवुमन अँड टुकटुक
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार :
आॅटो ड्रायव्हर