लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखा- राष्ट्रपतींचा सबुरीचा सल्ला

By admin | Published: November 16, 2015 08:41 PM2015-11-16T20:41:06+5:302015-11-16T20:43:19+5:30

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा आदर,सन्मान राखला पाहिजे असा सल्ला प्रणव पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना मुखर्जींनी दिला.

Honor the awards given by Lokmanyaati - The President's Advice Award | लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखा- राष्ट्रपतींचा सबुरीचा सल्ला

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखा- राष्ट्रपतींचा सबुरीचा सल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. १६ - एखाद्या गोष्टीशी, विचाराशी असहमत असाल तरी चर्चा करून वा संवाद साधून व्यक्त व्हा, पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नव्हे असे सांगत लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखला पाहिजे असा सबुरीचा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी असहिष्णू वातावरणाविरोधात पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना दिला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुरस्कार प्राप्त  पत्रकार व फोटो जर्नटलिस्ट्सचे अभिनंदन केले. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात निषेध नोंदवत सध्या अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, वैज्ञानिक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नसल्याचे स्पष्ट केले. 'मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे तुमची बुद्धी, कलागुण, परिश्रम, कष्ट यांना मिळालेली पावती, लोकमान्यता असते. त्यामुळे या सन्मानाचा आदर राखून त्यांचा सांभाळ करायला हवा, असे ते म्हणाले.
समाजातील काही घटनांमुळे संवेदशनशील लोकं अस्वस्थ होतात, पण त्यावरील प्रतिक्रिया ही संयमी असायला हवी. एखाद्या गोष्टीवरील आपली असहमती चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून पुढे यायला हवी, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच वादांवर तोडगा निघू शकेल अशा अनेक तरतूदी आपल्या राज्यघटनेत आहेत. त्यांच्या वापरातून सामाजिक संतुलन अबाधित राखले गेले पाहिजे, असा सूचक इशारा राष्ट्रपती मुखर्जी यांनी सरकारला दिला. 

Web Title: Honor the awards given by Lokmanyaati - The President's Advice Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.