कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान

By Admin | Published: May 22, 2017 09:47 PM2017-05-22T21:47:10+5:302017-05-22T22:03:22+5:30

ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला

Honor of "those" Major who built Jeep in Kashmiri youth | कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान

कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्कराने एका आंदोलकाला जीपला बांधून फिरवले होते. लष्कराच्या या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. गेल्या महिन्यात हे प्रकरण घडले होते. ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला त्या मेजर नितिन गोगोई यांचा सन्मान करण्यात आला आहे. मेजर  नितिन गोगोई यांचा दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमन्डेशनने सन्मान करण्यात आला आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी गोगोई यांचा सन्मान केला. गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देण्यात आले .
 
श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील बीरवाह भागामध्ये जमावाच्या दगडफेकीपासून स्वत:च्या बचावासाठी एका स्थानिक तरुणाला जीपला बांधण्यात आलं होतं. दगडफेक करणा-या जमावापासून संपूर्ण युनिटचा बचाव करण्यासाठी मेजर  नितिन गोगोई  यांनी हा निर्णय घेतला होता. नाखुषीने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. अखेर इलेक्शन डयुटीवर असलेले जम्मू-काश्मीरमधील अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना दगडफेक करणा-या जमावापासून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी युवकाला जीपला बांधले होते. त्यानंतर या प्रकरणात सैन्याच्या जवानांविरुद्ध पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 342 (चुकीच्या पद्धतीने एखाद्याला कारावासात ठेवणे), 149 (गुन्ह्यासाठी बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 367 (अपहरण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने त्या लष्करी अधिका-याच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.    
 
त्यापुर्वी काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती.

Web Title: Honor of "those" Major who built Jeep in Kashmiri youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.