बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:16+5:302015-07-12T21:58:16+5:30

सोलापूर :

Honorable students honored by Basaveshwar Pratishthan | बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next
लापूर :
जुळे सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मातोश्री रखमाबाई हत्तुरे मंगल कार्यालयात झालेल्या समारंभात शिक्षण संचालक एन. के. जरग यांच्या हस्ते सत्कार सोहळा झाला. यावेळी माजी मंत्री आनंदराव देवकते, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, उद्योजक विजय तंबाके, राजशेखर बुरकुले व संस्थापक श्रीशैल हत्तुरे आदी उपस्थित होते.
यावेळी आलुरे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी समतेचा विचार मांडला. त्यामुळे समाजात क्रांती झाली. हे प्रतिष्ठान बसवेश्वरांच्या विचारानुसार कार्य करीत आहे. यावेळी पन्नास शाळांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात आत्महत्या केलेले शेतकरी श्रीशैल हडसंगे यांच्या पत्नीला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली़

Web Title: Honorable students honored by Basaveshwar Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.