हुडको कर्जप्रकरणी तोडगा अंतिम टप्प्यात मनपाला भरावे लागणार जेमतेम ५० कोटी : सचिवस्तरीय समितीतील निर्णयानुसार देणार प्रस्ताव

By admin | Published: March 30, 2016 12:25 AM2016-03-30T00:25:25+5:302016-03-30T00:25:25+5:30

जळगाव : मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीप्रकरणी सचिवस्तरीय समितीत झालेल्या चर्चेनुसार १०० कोटींच्या आतच तडजोड होणार असल्याचे स्पष्ट झाले असून मनपा ५० ते ६० कोटींचा तडजोडीचा प्रस्ताव देणार असल्याचे समजते. याबाबत अतिरिक्त सचिवांच्या पत्राची मनपाला प्रतीक्षा आहे.

Hoodco will have to pay 50 crores for final phase of loan settlement in final stages: according to the decision of the secretary-level committee | हुडको कर्जप्रकरणी तोडगा अंतिम टप्प्यात मनपाला भरावे लागणार जेमतेम ५० कोटी : सचिवस्तरीय समितीतील निर्णयानुसार देणार प्रस्ताव

हुडको कर्जप्रकरणी तोडगा अंतिम टप्प्यात मनपाला भरावे लागणार जेमतेम ५० कोटी : सचिवस्तरीय समितीतील निर्णयानुसार देणार प्रस्ताव

Next
गाव : मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीप्रकरणी सचिवस्तरीय समितीत झालेल्या चर्चेनुसार १०० कोटींच्या आतच तडजोड होणार असल्याचे स्पष्ट झाले असून मनपा ५० ते ६० कोटींचा तडजोडीचा प्रस्ताव देणार असल्याचे समजते. याबाबत अतिरिक्त सचिवांच्या पत्राची मनपाला प्रतीक्षा आहे.
मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी हुडकोने डीआरटीत दावा दाखल केला आहे. त्यात डीआरटीने मनपाची बँक खाती सील करण्याचा आदेश दिल्याने मनपाने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने शासनाने कर्जास हमी दिलेली असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली असून त्यात मनपा आयुक्त तसेच हुडकोचे प्रतिनिधीही आहेत. या समितीतील चर्चेअंती मनपाला १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम भरावी लागणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यातही मनपाला ५० ते ६० कोटी रुपयेच तडजोडीअंती भरावे लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात मनपाने प्रस्ताव सादर करावा, या आशयाचे पत्र अतिरिक्त सचिवांकडून मनपाला प्राप्त होणार आहे. त्याची प्रतीक्षा मनपा प्रशासनाला आहे.
------------- इन्फो------
डीआरटीत २१ एप्रिल रोजी कामकाज
हुडकोने मनपाची बँक खाती सील करण्याचा अर्ज डीआरटीत दिला आहे. त्यावर मंगळवारी कामकाज होते. मात्र मनपाने डीआरएटीच्या नवी दिल्ली येथील प्राधिकरणात अपिल दाखल केलेले असल्याने व डीआरएटीने खाते सीलला तात्पुरती स्थगिती दिलेली असल्याने डीआरटीत मंगळवारी कामकाज झाले नाही. याप्रकरणी २१ एप्रिल रोजी पुढील कामकाज होणार आहे. तर डीआरएटीमध्ये १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे.

Web Title: Hoodco will have to pay 50 crores for final phase of loan settlement in final stages: according to the decision of the secretary-level committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.