बाबो! 20, 40 नाही तर तब्बल 82 हजार रुपये किलो, देशात "या" ठिकाणी पिकतेय जगातील सर्वात महागडी भाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 05:43 PM2021-02-02T17:43:07+5:302021-02-02T17:49:39+5:30
Hop Shoots : ब्रिटन आणि जर्मनीतील लोकांना ही भाजी खूप आवडते. वसंत ऋतू सुरू हा हॉप शूट्स या भाजीसाठी फायदेशीर आहे.
नवी दिल्ली - बाजारात साधारण 20 ते 40 रुपये किलोपासून भाजी मिळते. मात्र तुम्हाला जर कोणी एक किलो भाजीसाठी तब्बल 82 हजार रुपये मोजावे लागतील असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. बिहारच्या औरंगाबादमध्ये 82 हजार रुपये किलो विकणारी भाजी पिकवली जात आहे. या भाजीची शेती केली जात असून ही जगातील सर्वात महागडी भाजी असल्याचं सांगितलं जात आहे. भाजीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
हॉप शूट्स (Hop Shoots) असं जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव आहे. एक किलो Hop Shoots ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1000 युरो म्हणजेच 82 हजार रुपये आहे. ही भाजी सर्वसाधारणपणे दुकानात वा भाजी विक्रेत्यांकडे पाहायला मिळत नाही. औरंगाबादमधील शेतकरी अमरेश कुमार सिंह यांच्या शेतामध्येच ही भाजी पाहायला मिळते. नवीनगर प्रखंड येथील करमडीह गावात याची शेती केली जात आहे. अमरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय भाजी अनुसंधान वाराणसी कृषी वैज्ञानिक डॉक्टर लाल यांच्या मार्गदर्शनाखाली या भाजीची ट्रायल शेती करण्यात आली आहे.
2 महिन्यांपूर्वी याचं रोप लावण्यात आलं होतं. आता हळूहळू हे रोप मोठं होत आहे. Hop Shoots भाजी बाजारात उपलब्ध होत नाही. याचा वापर अँटीबायोटीक औषधं तयार करण्यासाठी आणि TB च्या आजारात औषध तयार करण्यासाठी केला जातो. या रोपांच्या फुलांचा वापर बिअर तयार करण्यासाठी केला जातो. या फुलांना हॉप कोन्स म्हणतात. तर बाकी फांद्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. यापासून लोणचंही तयार केलं जातं. मात्र ते बरंच महाग असतं.
यूरोपीय देशांमध्ये या भाजीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ब्रिटन आणि जर्मनीतील लोकांना ही भाजी खूप आवडते. वसंत ऋतू सुरू हा हॉप शूट्स या भाजीसाठी फायदेशीर आहे. भारत सरकार सध्या भाज्यांचं वैज्ञानिक रिचर्स करीत आहे. वाराणसी येथील भाजी अनुसंधान संस्थेत या भाजीच्या शेतीवर बरंच काम सुरू आहे. अमरेश यांनी या शेतीसाठी विनंती केली होती, ज्याला मान्यता देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे. ते मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जातेय"https://t.co/k6q7XxPMCx#Congress#RahulGandhi
— Lokmat (@MiLOKMAT) January 30, 2021