चाँद तारों को छूने की आशा, आसमानों मे उडने की आशा
By admin | Published: October 18, 2016 04:41 AM2016-10-18T04:41:10+5:302016-10-18T04:41:10+5:30
‘चाँद तारों को छूने की आशा, आसमानों मे उडने की आशा...’ पण, काश्मीरातील परिस्थितीमुळे हे स्वप्न सत्यात उतरणार की नाही?
जम्मू : ‘चाँद तारों को छूने की आशा, आसमानों मे उडने की आशा...’ पण, काश्मीरातील परिस्थितीमुळे हे स्वप्न सत्यात उतरणार की नाही? असा प्रश्न मनात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर उत्तरही एव्हाना शोधले आहे. आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी हे विद्यार्थी आता जम्मूकडे शिक्षणासाठी धाव घेऊ लागले आहेत.
काश्मीर खोऱ्यात १०० दिवसांपासून जनजीवन विस्कळीत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जम्मूत जाण्याशिवाय अनेक विद्यार्थ्यांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील १७ वर्षीय सुरैय्या गुलजार नागरी सेवेत जाऊ इच्छिते. तर, पुलवामाच्या खुर्शीदला ह्दयरोग तज्ज्ञ व्हायचे आहे. १२ वीतील खुर्शीद म्हणतो की, आम्ही जर शिकलो नाही तर जगाच्या स्पर्धेत कसे उभे राहू शकणार? येथे शंभर दिवसांपासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने जम्मूच्या एखाद्या
शाळेत जाण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. गुलजार म्हणते की, शाळा जर बंद केल्या जात असतील तर तुम्ही आयएएस, डॉक्टर, इंजिनियर कसे होणार? आम्ही काही दिवस शाळा सुरू होण्याची वाट पाहिली. अखेर जम्मू येथे शाळेत प्रवेश घेतला. खुर्शीद म्हणतो की, त्याचे अनेक मित्र शिक्षण पुढे सुरू ठेवू इच्छितात. पण, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने बाहेरगावी प्रवेश घेऊ शकत नाहीत. गुलजारसह तीन विद्यार्थ्यांनी जम्मूच्या सुनजवान भागात सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला आहे. प्राचार्य पे्रम सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत काश्मीरच्या ३० विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे दररोज काश्मीर खोऱ्यातून अनेक फोन येतात.
प्रवेशासाठी ते विचारणा करतात. परीक्षा वेळेवरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारनेही वेळेवर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूच्या खासगी शाळातही गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत. (वृत्तसंस्था)
>परीक्षा वेळेवरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारनेही वेळेवर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूच्या खासगी शाळातही गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत.