स्वातंत्र्यदिनानंतर लगेचच युद्धासारख्या मोठ्या संकटांचे संकेत; भारताच्या कुंडलीवरून भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:19 PM2020-08-13T14:19:27+5:302020-08-13T14:39:26+5:30
येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्षे पूर्ण होणर आहेत. मात्र, कुंडलीच्या नियमानुसार भारताच्या स्वातंत्र्याची कुंडली राशी-अंश-कलेवर सूर्य 14 ऑगस्ट सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी पोहोचणार आहे.
पृथ्वी सुर्याची परिक्रमा 365 दिवस आणि काही तासांत पूर्ण करते. याला ज्योतिषशास्त्रात एक नक्षत्र म्हटले जाते. ज्योतिषामध्ये पृथ्वीसापेक्ष सर्व ग्रहांचा अभ्यास केला जातो, त्यामुळे यास सुर्य कुंडली म्हटले जाते. व्यक्तीसारखीच एखाद्या देशाचीही कुंडली काढून त्याचे भविष्य सांगितले जाते. भारताचा स्वातंत्र्यदिवस दोन दिवसांवर आहे. यानिमित्ताने ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी भारताची कुंडली काढली आहे.
येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्षे पूर्ण होणर आहेत. मात्र, कुंडलीच्या नियमानुसार भारताच्या स्वातंत्र्याची कुंडली राशी-अंश-कलेवर सूर्य 14 ऑगस्ट सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी पोहोचणार आहे. या वेळी वर्ष कुंडलीमध्ये धनु लग्न उदय होत आहे. जो स्वतंत्र भारताच्या वृषभ लग्न कुंडलीच्या अष्टमात आहे. हे खूप वाईट संकेत आहेत. एखादे युद्ध किंवा मोठ्या नेत्यासोबत अत्यंत वाईट घटना घडण्याचे संकेत देत आहे.
धनु लग्नाच्या वर्ष कुंडलीमध्ये सप्तमात राहु आणि सहाव्या घराचे स्वामी शुक्र सोबत युत होऊन एक खतरनाक योग तयार करत आहेत. युद्धासाठीचा ग्रह मंगळाची दृष्टी अशुभ आहे. बुध विनाश स्थानी म्हणजेच आष्टमातून शनी ग्रहाकडे जातो. हे सारे योग भारताच्या कुंडलीमध्ये मोठ्या युद्धाचे संकेत देत आहेत. 15 ऑगस्टच्या काही दिवसांनंतर चीन भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या मदतीने हल्ला करण्य़ाची किंवा सैन्य ताकद दाखविण्याचा प्रयत्न करू शकतो.
धनस्थानी वक्री असलेल्या शनीवर सुर्य आणि बुधाची दृष्टी अर्थव्य़वस्थेतील मंदी सुरुच राहणार तसेच सरकारद्वारे बाजारातील हस्तक्षेपाचे संकेत देत आहे. तसेच सेन्सेक्समध्ये घसरण आणि सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ राहण्याचे संकेत देत आहे.
गेल्या वर्षी 370 रद्द करणे तसेच राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरु झआले आहे. नव्या कुंडलीमध्ये राहु आणि शुक्राची युती विवाह संबंधी कायद्यांमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. विवाह, संपत्ती, वारसदार, दत्तक आदी नियमांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. यामुळे सरकारला मोठ्या समुहांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. सामाजिक बदलांमुळे देशात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. याबाबतची माहिती एनबीटीने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले
आयकर विभागातील 'जुगाड' संपणार, कर प्रणाली झाली फेसलेस; मोदींकडून लोकार्पण
सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात
रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा
राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने
तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही
Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2