भयानक प्रथा! सुनेला आणण्यासाठी पोटच्या पोरीचे लग्न दारुड्याशी लावले; सासरी गेल्यावर पतीने...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 12:32 PM2023-01-05T12:32:06+5:302023-01-05T12:33:15+5:30

राजस्थानात साट्या लोट्यासारखी एक प्रथा आहे आटा-साटा.... सुनेला आणण्यासाठी सुनेच्या घरातील व्यक्तीसोबत आपल्या घरातील एका मुलीचे लग्न लावून दिले जाते.

Horrible practice in Rajasthan! To get a daughter-in-law, the girl was married to a drunkard man; husband beat her | भयानक प्रथा! सुनेला आणण्यासाठी पोटच्या पोरीचे लग्न दारुड्याशी लावले; सासरी गेल्यावर पतीने...

भयानक प्रथा! सुनेला आणण्यासाठी पोटच्या पोरीचे लग्न दारुड्याशी लावले; सासरी गेल्यावर पतीने...

Next

राजस्थानात साट्या लोट्यासारखी एक प्रथा आहे आटा-साटा.... सुनेला आणण्यासाठी सुनेच्या घरातील व्यक्तीसोबत आपल्या घरातील एका मुलीचे लग्न लावून दिले जाते. यात त्या मुलीचे मत विचारले जात नाही, की तिच्या लायक मुलगा पाहिला जात नाही. मुलगी जो मिळेल त्याच्या गळ्यात बांधून दिली जाते. यामुळे अनेक महिलांनी आत्महत्येसारखी पाऊले देखील उचलली आहेत. अनेकींनी घटस्फोटही घेतले आहेत. असाच एक प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे.

भावाचे घर वसविण्यासाठी माझ्या वडिलांनी माझे लग्न एका दारुड्याशी करून दिले. सासरी आली तर त्याला मी आवडतच नसल्याचे त्याने सांगितले. त्याला तिचा चेहरादेखील पहायचा नाहीय, त्यानेही बहीणीचे घर वसविण्यासाठी तिच्याशी लग्न केले आहे, असे या तरुणीला पतीने सांगितले आणि धक्काच बसला. 

काही दिवसांनी तर तिच्या पोटात दुसऱ्याचेच मुल असल्याचा आरोप पतीने केला. मारहाण करून घरातून हाकलून दिले. वडिलांना फोन केला तर जसे रहायचे तसे तिथेच रहा, घरच्यांनी ठार मारले तर अंत्यसंस्काराला येईन असे सांगून फोन कट केला, अशा शब्दांत तरुणीने दैनिक भास्करला आपबीती सांगितली आहे. 

पतीची बहीण तिच्याच भावाला देण्यात आली आहे. यामुळे भावाचा संसार तुटावा म्हणून मी काहीच बोलत नाहीय, सहन करत होती. एके रात्री पतीने खोलीत येत तिच्या पोटात दुसऱ्याचेच मुल घेऊन ती आली असल्याचा आरोप केला. मला धक्का बसला. मी त्याला म्हटले डॉक्टरकडे जाऊन तपासणी करू, तर त्यावर मला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. दीरानेही मारहाण केल्याचे ती म्हणाली. 

तसेच जीवे मारण्याची धमकी देत पतीने मध्य रात्रीच घरातून बाहेर काढले. वडिलांना फोन केला तर त्यांनीदेखील मदत केली नाही. सकाळी माहेरी गेली तर भावाची बायको देखील तिच्या माहेरी निघून गेली. ती पुन्हा आली नाही. तिला आणण्यासाठी भाऊ गेला तर त्यालाही मारहाण करण्यात आली, अशी आपबीती या महिलेने सांगितली आहे. 

राजस्थानमध्ये या भयानक प्रथेविरोधात सामाजिक संघटना आवाज उठवत आहेत, परंतू ही प्रथा काही बंद होत नाहीय. मोदी सरकारने मुस्लिम महिलांच्या सुरक्षेसाठी ट्रिपल तलाक कायदा आणला परंतू राजस्थानच्या या साट्या लोट्याविरोधात सर्व राजकीय पक्ष देखील सुस्त आहेत, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. 

Web Title: Horrible practice in Rajasthan! To get a daughter-in-law, the girl was married to a drunkard man; husband beat her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.