हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:11 IST2025-04-11T19:10:59+5:302025-04-11T19:11:42+5:30
रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे.

हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...
तुम्हाला जर कोणी ७-८ तास टॉयलेटला जाऊ दिले नाहीतर किंवा जेवण करू दिले नाही तर, काय होईल. अशा ठिकाणी तुम्ही काम कराल का? रेल्वेने यासाठी रेल्वे चालविणाऱ्या लोको पायलटना ब्रेक मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एखाद्या तुरुंगातही एवढे टॉर्चर केले जात नसेल तेवढा त्रास या लोकोपायलटना सहन करावा लागत आहे.
रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे. किती हॉरिबल आहे, कर्मचाऱ्यांप्रती साधी माणुसकीदेखील दाखविण्यात आलेली नाही.
देशात रेल्वे अपघातात लक्षणीय वाढ झाली आहे, या पार्श्वभूमीवर रेल्वेचा हा तुघलकी निर्णय आला आहे. एखाद्या लोकोपायलटला टॉयलेटला जायचे असेल तर त्याने सिग्नलवर गाडी थांबेपर्यंत तसेच थोपवून धरायचे, हे किती त्रासदायक आहे. ट्रेनचे संचालन बाधित होईल या एकमेव कारणासाठी रेल्वे बोर्डाने ही मागणी फेटाळली आहे.
याचबरोबर लोकोपायलटच्या केबिनमध्ये कर्मचाऱ्यांचा आवाज आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम देखील लावण्यात येणार आहे. याचाही बाजु या मंडळींनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या कृती आम्हाला रेकॉर्ड करायच्या नाहीत तर अपघात झाला तर त्याचे कारण शोधण्यासाठी आणि त्यावर अंमल करण्यासाठी हे केले जाणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
महिला लोकोपायलटने काय करायचे...
लोकोपायलटला शौचालयासाठी ब्रेक देण्याची सोय देण्यास नकार दिला आहे. अनेक सुपरफास्ट ट्रेन या ६-७ तास न थांबता धावत असतात. यावेळी पुरुषच काय तर महिला लोकोपायलटसाठी टॉयलेटला न जाण्यास देणे खूप अत्याचार करणारा निर्णय आहे. या ट्रेन आपत्कालीन परिस्थितीशिवाय कुठेही अधे मधे थांबत नाहीत, असे AILRSA संघटनेचे सचिव व्ही भालचंद्रन यांनी म्हटले आहे. या संघटनेने रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.