खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 15:58 IST2023-10-12T15:57:45+5:302023-10-12T15:58:15+5:30
लोकांनी सोशल मीडियावरून याची तक्रार केल्यानंतर प्रकरण चौकशीला गेले आहे.

खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश
बरेलीमधून मोठी खळबळ उडविणारी बातमी येत आहे. पोलीस शिपाई तिथे फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी पैसे मागताना सापडला आहे. लोकांनी सोशल मीडियावरून याची तक्रार केल्यानंतर प्रकरण चौकशीला गेले आहे. लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांना टॅग करत त्याचे स्क्रीन शॉट पाठवत तक्रारी केल्या आहेत. तसेच या शिपायाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
सुहेल अन्सारी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. एसएसपीनी सायबर पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीचा अहवाल तत्काळ द्यावा असेही सांगण्यात आले आहे.
अन्सारीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून लोकांकडे ही मागणी केली आहे. लोकांनी या पोलीसाचे प्रोफाईल आणि त्याने केलेली पोस्ट पोलिसांना पाठविली आहे. त्याने पोस्ट शेअर करण्यासही सांगितले आहे. तसेच एक पोस्ट शेअर केली की एक डॉलर मिळणार असल्याचेही म्हटले आहे. तसेच जो पैसा द्याल तो इस्लामिक रिलिफ युएसएच्या अकाऊंटला थेट पाठवा असेही त्याने म्हटले आहे.