हरियाणात भीषण अपघात, कार आणि ट्रकची धडक, ५ मित्रांसह ६ तरुणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:57 PM2023-10-11T12:57:09+5:302023-10-11T12:57:34+5:30

कॅंटरच्या क्लिनरची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्वांचे मृतदेह भिवानी येथील चौधरी बन्सीलाल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.

Horrific accident in Haryana, car and truck collide, 6 youths die along with 5 friends | हरियाणात भीषण अपघात, कार आणि ट्रकची धडक, ५ मित्रांसह ६ तरुणांचा मृत्यू

हरियाणात भीषण अपघात, कार आणि ट्रकची धडक, ५ मित्रांसह ६ तरुणांचा मृत्यू

हरियाणातील भिवानी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे रात्री उशिरा बलेनो कारमधून मित्राला घरी सोडण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. वाटेत कार कॅंटरला धडकली आणि त्यामुळे सर्वांचा मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची गोळ्या घालून हत्या; पठाणकोट हल्ल्याचा होता मास्टरमाईंड

मिळालेल्या माहितीनुसार, पाच मित्र बलेनो कारमधून आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात होते. यादरम्यान कारची ट्रकला धडक बसली. मरण पावलेल्यांमध्ये प्रदीप (30, रा. लडियानली), रवी (22, रा. इंदिवली गाव), जितेंद्र (30, रा. नारनौंड), विकास (28) आणि नसीब (27, रा. बुडेदा गाव) यांचा समावेश आहे. कॅंटरच्या क्लिनरची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्वांचे मृतदेह भिवानी येथील चौधरी बन्सीलाल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना भिवानीतील बहल भागातील सेर्ला गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा रात्री 11.30 च्या सुमारास घडली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, बेलेनो कारचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

Web Title: Horrific accident in Haryana, car and truck collide, 6 youths die along with 5 friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात